सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला संसर्ग झाला (Corona infection in Savitribai Phule Pune University).

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 11:02 AM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला (Corona infection in Savitribai Phule Pune University). त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या शिरकावानंतर विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचारी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन कामांवर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.

पुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (18 जुलै) दिवसभरात 2081 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48 हजार 953 वर पोहचली आहे. काल (18 जुलै) दिवसभरात 39 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1282 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही मोठं आहे. काल दिवसभरात 774 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Pune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून (19 जुलै) काही प्रमाणात शिथिल होत आहेत (Pune lockdown restriction changes). याप्रमाणे नागरिकांना आजपासून जीवनाश्यक वस्तू खरेदीला अधिक सूट मिळणार आहे. दुकानं सुरु करण्याच्या वेळेतही बदल करत आज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. मात्र सोमवारपासून दुकानांसाठी सकाळी 8 ते 12 पर्यंतचीच वेळ असणार आहे.

दरम्यान, दारु दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील उपाययोजनांचीही माहिती दिली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

13 जुलै रोजी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा शनिवारी (18 जुलै) पहिला टप्पा संपला. 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन आहे. आज 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सकाळपासून जीवनावश्यक दुकानांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे आज गटारी असल्यामुळे मटण, चिकन दुकानांच्या बाहेरही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत असल्याने आज मटण चिकन विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

हेही वाचा :

Pune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर

Corona infection in Savitribai Phule Pune University

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.