पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढताच, बाधितांचा आकडा 3,795 वर
पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत (Corona Patient increase Pune) आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत (Corona Patient increase Pune) आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात काल (16 मे) एकाच दिवसात तब्बल 228 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 795 वर पोहोचली (Corona Patient increase Pune) आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे आतार्यंत 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1952 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काल दिवसभरात पुण्यात 73 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीत काल 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 185 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच पुणे शहरात काल एका दिवसात 202 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 295 वर पोहोचली आहे.
त्याशिवाय शहरात काल 68 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरातील 1698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात काल अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेले रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात काल 228 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर यापेक्षा जास्त 286 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या 1412 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 149 क्रिटिकल आणि 41 रुग्ण व्हेटिलेटरवर आहेत.
दरम्यान, राज्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 30 हजार 706 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 1135 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 7 हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह
पुण्यातील विवाह इच्छुकांना दिलासा, 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न करता येणार