“कामगार कुठले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले?” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा

"जंबो कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी कामगार कुठून मागवले?" असा प्रश्न अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

कामगार कुठले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले? जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 3:36 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोव्हिड सेंटरचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शहरात आले होते. यावेळी महाराष्ट्रीय कामगार कामासाठी पुढे येत आहेत का, याची चाचपणी अजित पवारांनी केली. (Deputy CM Ajit Pawar visits Pimpari Chinchwad Jumbo COVID Center)

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील नेहरुनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअमवर ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या एक हजार बेडचे जम्बो कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येत आहे.

पाहणी करण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी “जंबो कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी कामगार कुठून मागवले?” असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. “आपल्याकडे दोन टीम आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्राचे आहेत” असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. “महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील आहेत?” असे पुढे दादांनी विचारले. यावर “कामगार कोकण आणि मुंबईत राहणारे परप्रांतीय आहेत” असे उत्तर त्यांना मिळाले.

“म्हणजे पाठीमागच्या काळात मुंबईत आल्याने मुंबईकर झालेले. त्यांना येण्यासाठी बस-रेल्वेचा काही प्रॉब्लेम नाही न?” अशी विचारणाही अजित पवारांनी केली. त्यावर “आता काही प्रश्न नाही. कालच कोल्हापूर आणि अहमदनगरहून बसने नर्स आल्या” अशी माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली. (Deputy CM Ajit Pawar visits Pimpari Chinchwad Jumbo COVID Center)

हेही वाचा : हॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता…अजित पवारांना फोन, दादा म्हणाले, तुम्ही भेटा, परिस्थिती सांगतो..

परप्रांतीय मजुरांनी स्थलांतर केल्यानंतर मराठी माणसाने त्यांची जागा घ्यावी, असं आवाहन अनेक नेत्यांनी केलं आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रीय कामगार कामासाठी पुढे येत आहेत का, याची चाचपणी अजित पवारांनी केली.

दरम्यान, राज्य सरकार, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे रुग्णालय उभारत आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत, असेही अजित पवारांनी सांगितले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधील रुग्णवाढीचा आलेख उंचावतच आहे. भविष्यातील रुग्णवाढीचा अंदाज घेऊन राज्य सरकार, दोन्ही पालिका, जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए जम्बो सुविधांची निर्मिती करत आहे. (Deputy CM Ajit Pawar visits Pimpari Chinchwad Jumbo COVID Center)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.