सुप्रिया सुळेंच्या दोन मागण्या, मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी नको आणि….
पुणे: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केला. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली […]
पुणे: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केला. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नसून सरकारनं सीबीआयचं कंबरडं मोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. शिवाय आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली.
सीबीआयवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची रॉ कडून चौकशी व्हावी, तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
“ईव्हीएम हॅकिंगची घटना धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाकडे अनेक वर्षांपासून आम्ही ईव्हीएम बंदीची मागणी करत आहे. अनेक विकसित देशात बॅलेटवर मतदान होतं, मग आपणच का ईव्हीएमचा आग्रह धरतोय”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
ईव्हीएमबाबत लोकशाहीला धक्का देणारा आरोप झाला आहे. निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत रॉ कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
निवडणूक आयोग ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फेटाळून लावत असलं, तरी चौकशी झाली पाहिजे. मुंडे साहेब लोकनेते होते, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर येत्या निवडणुकीत मतदान हे मतपत्रिकेवर व्हावं, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
अमेरिकन एक्स्पर्टचा आरोप काय?
अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.
युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आलं.
संबंधित बातम्या
फडणवीस-महाजनांवर भाजप आमदार अनिल गोटेंचे सनसनाटी आरोप
धुळ्यात अनिल गोटेंच्या पत्नीचा विजय, मुलाचा पराभव
धुळे महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा, अनिल गोटेंच्या पक्षाचा सुपडासाफ