Pune station crowd | प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी

पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच गर्दी आहे. (crowd at Pune railway station)सुट्ट्यांमुळे अनेकजण गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली आहे.

Pune station crowd | प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 7:33 PM

पुणे : कोरोनाशी लढा देण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं (crowd at Pune railway station) जात असताना, पुण्यातील रेल्वे स्थानकात वेगळंच चित्र आहे.  पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच गर्दी आहे. (crowd at Pune railway station)सुट्ट्यांमुळे अनेकजण गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली आहे. मात्र हीच गर्दी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे या गर्दीतून तो आणखी बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे पिंपरी 12 आणि पुणे 9 मिळून 21 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

असं असताना जे कामानिमित्त पुण्यात राहतात, ते आता शनिवार आणि रविवारी साधून पुणे सोडणे पसंत करत आहेत. परिणामी रेल्वे स्टेशन खचाखच भरलं आहे. मात्र त्यामुळे कोरोना बळावण्याचा धोका आणखी वाढला आहे.

अजित पवारांचं आवाहन

कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावलं (Ajit Pawar on Pune transport) उचलत आहे. मात्र नागरिकांनी गर्दी कमी करुन कोरोनाचा संसर्ग (Ajit Pawar on Pune transport) टाळायला हवा. मुंबईतील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत आहे. तोच विचार पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत आहे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनावश्यक प्रवास टाळावा, जर अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा नाईलाजास्तव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले.

सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ते निर्णय पुढचे आदेश निघेपर्यंत कायम राहतील. मुंबई, पुणे, पिंपरी  आणि नागपुरातील अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व  दुकाने, कार्यालये बंद राहतील, असं अजित पवारांनी सांगितलं.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.