मुळशी पॅटर्न! शेतकरी पुत्राचं वऱ्हाड हेलिकॉप्टरने निघालं

पुणे : प्रत्येक जण लग्न आपापल्या पद्धतीने करतो. कुणी खर्च वाचवतो, तर कुणी अमाप खर्च करतो. लग्न अवीस्मरणीय बनवण्यासाठी अनेक आई-वडील हटके पद्धती अवलंबतात. असाच हटके प्रकार पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत घोड्यावर किंवा सजवलेली चारचाकी, रथावर मिरवणूक काढण्याची पद्धत तुम्ही पाहिली असेल. आता तर चक्क हौशी नवरदेवाने हेलिकॉप्टरमधून वऱ्हाड घेऊन जाण्याची प्रथाच सुरू […]

मुळशी पॅटर्न! शेतकरी पुत्राचं वऱ्हाड हेलिकॉप्टरने निघालं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

पुणे : प्रत्येक जण लग्न आपापल्या पद्धतीने करतो. कुणी खर्च वाचवतो, तर कुणी अमाप खर्च करतो. लग्न अवीस्मरणीय बनवण्यासाठी अनेक आई-वडील हटके पद्धती अवलंबतात. असाच हटके प्रकार पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत घोड्यावर किंवा सजवलेली चारचाकी, रथावर मिरवणूक काढण्याची पद्धत तुम्ही पाहिली असेल. आता तर चक्क हौशी नवरदेवाने हेलिकॉप्टरमधून वऱ्हाड घेऊन जाण्याची प्रथाच सुरू झाली आहे. मावळ तालुक्यातील डोणे या गावातलं हे लग्न आहे. नवरदेवाने चक्क भाडे तत्वावर हेलिकॉप्टर घेऊन आपले वऱ्हाड नवरीच्या दारी नेलं.

शहरी तसेच ग्रामीण भागात लाखो रूपये खर्च करून थाटात विवाह सोहळा पार पाडणे काही नवीन नाही. गावाकडील काही हौसी नवरदेव आता विवाहस्थळी जाण्यासाठी हेलिकॉप्टरच बूक करू लागलेले दिसतात. मावळातील डोणे येथील  नवरदेवाने 8 मे रोजी साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी शिवपार्वती लॉन  हिंजवडी पुणे येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. डोणे गावातील शेतकरी कुंटुबातल्या नवरदेवाचे नाव अशोक वाडेकर असे आहे. केवळ दिवंगत वडिलांची इच्छा असल्यानेच लग्नात हेलिकॉप्टर आणल्याची माहिती नवरदेवाने दिली.

घोटावडे मुळशी येथील काळुराम देवकर यांची मुलगी पुजा हिच्याशी होणाऱ्या लग्नासाठी वाडेकर कुटुंबीयांनी पुणे येथील एका कंपनीचे हेलिकॉप्टर 75 हजार रूपये प्रतितास दराने भाडेतत्वार घेतलं. हेलिकॉप्टर सकाळी दहा वाजता मावळ तालुक्यातील छोट्याशा डोणे गावात पोहोचलं. हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही तर आपल्या घराच्या छतावरही थांबले होते.

अकरा वाजण्याच्या सुमारास डोणे गावातून वाजत गाजत शाही थाटात नवरदेवाची वरात काढण्यात आली. अवघ्या मिनिटातच नवरदेव नातेवाईकांसोबत हॅलिकॉप्टरमध्ये बसून नवरी आणण्यासाठी आकाशात उडाला. छोट्याशा खेडेगावात रंगलेल्या या शाही विवाह सोहळ्याची तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.