पुण्यात खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु, एकावेळी 6 प्रवासी, ताशी 85 हजार दर
केंद्र सरकारनं 26 मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवेला परवानगी दिली. त्यानंतर आता पुण्यातही खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु झाली आहे (AeroTrans Helicopter Servises).
पुणे : केंद्र सरकारनं 26 मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवेला परवानगी दिली. त्यानंतर आता पुण्यातही खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु झाली आहे (AeroTrans Helicopter Servises). पुण्यात अॅरोट्रान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने खासगी हवाई वाहतुकीला सुरुवात केली. राज्यासह देशभरात ही वाहतूक सेवा उपलब्ध आहे. कंपनीकडून हेलिपॅड असेल त्या ठिकाणी हवाई सेवा दिली जात आहे. या कंपनीकडे 3 हेलिकॉप्टर आणि 1 विमान असल्याचं अॅरोट्रान्सने सांगितलं आहे.
अॅरोट्रान्सच्या या हेलिकॉप्टरमधून एकावेळी 6 जण प्रवास करु शकतात. हे हेलिकॉप्टर बेल 407 या प्रकारातील आहे. या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रति तास 85 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हे हेलिकॉप्टर एकदा उड्डाण केल्यानंतर 400 किलोमीटरपर्यंत इंधन न भरता उड्डाण करते. एकदा इंधन भरल्यानंतर ते दोन ते अडीच तास उड्डाण करते. प्रवासाच्या आधी याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली जाते. हे विमान भारतीय विमान प्राधिकरणाच्या अंतर्गत येते. प्राधिकरणाच्या परवानगीनंतरच हेलिकॉप्टर प्रवासासाठी उड्डाण घेते. या विमानाची वाहतूक सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असते.
या हेलिकॉप्टरसाठी राजकीय लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि हौशी नागरिकांची मागणी आहे. बिझनेस मीटिंग, सहलीसाठी देखील या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. मुंबई आणि पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळं प्रवाशांची संख्या मंदावली होती. त्यानंतर आता पुन्हा प्रतिसाद वाढताना दिसत आहे.
हेही वाचा :
समुद्राशी संबंध नसलेल्या फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, कोकण दौऱ्यावरुन पवारांचा टोला
Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार
AeroTrans Helicopter Servise in Pune