मर्दानी आजीला 1 लाख आणि साडीचोळी, गृहमंत्री अनिल देशमुख थेट दारात

शांताबाई पवार या 85 वर्षीय आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला (Anil Deshmukh Meet Social Media Star Shantabai Pawar) होता.

मर्दानी आजीला 1 लाख आणि साडीचोळी, गृहमंत्री अनिल देशमुख थेट दारात
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 7:22 PM

पुणे : लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी एक लाखांचा धनादेश आणि नऊवारी साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याबाबतचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. शांताबाई पवार या 85 वर्षीय आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. यानंतर अनेकांनी त्यांना मदतीसाठी हात पुढे केले आहेत.  (Anil Deshmukh Meet Social Media Star Warrior Pune Grandma Shantabai Pawar)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील शांताबाई पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक लाख रुपये आणि नऊवारी साडी भेट देत त्यांचा सन्मान केला. तसेच शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासनही गृहमंत्र्यांनी त्या आजींना दिले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“आज पुणे येथील वॉरिअर आजी ‘शांताबाई पवार’ यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अनेकांकडून मला 85 वर्षांच्या शांता आजींची जगण्याची कसरत समजली. त्यांना भेटून मला एक नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. मी पक्षातर्फे एक लाख रुपये व नऊवारी साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला,” असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले. तसेच याबाबतचा व्हिडीओही त्यांनी ट्विट केला आहे. (Anil Deshmukh Meet Social Media Star Warrior Pune Grandma Shantabai Pawar)

शांताबाई पवार नेमक्या कोण? 

वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली.

उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असं आजी सांगतात.

शांताबाई पवार यांनी ढालपट्टा आणि बाटलीवर तोल सांभाळतानाचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले. “काही वर्षांपूर्वी तारेवर चालताना पाय मोडला होता, तर बाटलीवर तोल सांभाळताना पडून हाताला दुखापत झालेली. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली, हात अजूनही दुखतो, तरीही जिद्दीने हे खेळ अजूनही खेळते आणि पोटाची खळगी भरते” असे आजी म्हणाल्या. कठीण काळात मदतीचे अनेक हात पुढे आले. कधी सत्कार झाला, तर कधी आर्थिक हातभार मिळाला, असेही आजी आवर्जून सांगतात. (Anil Deshmukh Meet Social Media Star Warrior Pune Grandma Shantabai Pawar)

संबंधित बातम्या  : 

Shantabai Pawar | पुण्यातील आजीबाईंचा लाठ्याकाठ्यांचा खेळ, रितेशही म्हणाला ‘लय भारी’

Shantabai Pawar | आठव्या वर्षी ढालपट्टा सुरु, ‘सीता और गीता’मध्ये काम, पुण्यातील 85 वर्षांच्या शांताबाईंचा प्रेरणादायी प्रवास

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.