गृहमंत्र्यांसह 3 मंत्र्यांनी बदलीसाठी शिफारस केलेला पुण्यातील हवालदार चक्क लाचखोर
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह 3 मंत्र्यांनी बदलीसाठी शिफारस केलेला पुण्यातील हवालदार चक्क लाचखोर निघाला आहे (Home minister recommended Police caught by ACB)
पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह 3 मंत्र्यांनी बदलीसाठी शिफारस केलेला पुण्यातील हवालदार चक्क लाचखोर निघाला आहे (Home minister recommended Police caught by ACB) . या लाचखोर हवालदारासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिफारस केली होती. विलास तोगे असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे. त्याने या तिन्ही मंत्र्यांच्या शिफारशीसह पोलीस आयुक्तांकडे बदलीसाठी अर्ज केला होता. मात्र, मंत्र्यांनी शिफारस केलेला हा पोलीस हवालदारच लाचखोर निघाल्यानं मंत्र्यांच्या शिफारशीवर शंका निर्माण झाली. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेणार असल्याचं सांगितलं.
विलास तोगेला वारजे पोलीस ठाण्यातून भारती पोलीस ठाण्यात बदली हवी होती. यासाठी त्याने जानेवारी महिन्यात 3 मंत्र्यांचे शिफारस पत्र पोलीस आयुक्तांना सादर केले होते. या शिफारस पत्रात आई, वडील आजारी असून उपचारासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. घरापासून वारजे पोलीस ठाणे 11 किलोमीटर आहे. त्यामुळे भारती पोलीस ठाण्यात बदली करावी, अशी मागणी या अर्जात केली होती. या शिफारस पत्रात तोगेनं कोंढवा पोलीस ठाण्यात 30 ते 35 गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याचं म्हटलं होतं. तसेच या प्रकरणी बक्षीस देखील मिळाल्याचं नमूद करत मे 2019 रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला बदली केल्याचा उल्लेख आहे.
विलास तोगे हा वारजे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर काम करतो. पोलीस आयुक्तांकडे मंत्र्यांच्या शिफारशीसह बदलीसाठी अर्ज केलेला असतानाच तो लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. त्याने एका आरोपीकडून अटक टाळण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. याआधी त्याने 38 हजार स्वीकारले देखील होते. यावेळी उर्वरीत 12 हजार घेताना तो लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. मात्र, अशा लाचखोर पोलीस हवालदाराच्या बदलीसाठी चक्क तीन मंत्र्यांनी शिफारस केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
योगायोग बघा, 2014 पासून दाऊद सहा वेळा मरुन जिवंत झाला : सचिन सावंत
राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री
Police caught while taking bribe by ACB