पुण्यात हडपसरमध्ये 5 दिवसांचा जनता कर्फ्यू, तर कंटेनमेंट झोनमधील झोपडपट्ट्यांमध्ये 6 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे (Janta Curfew and complete lockdown in Pune).

पुण्यात हडपसरमध्ये 5 दिवसांचा जनता कर्फ्यू, तर कंटेनमेंट झोनमधील झोपडपट्ट्यांमध्ये 6 दिवस संपूर्ण लॉकडाऊन
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 9:02 PM

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे (Janta Curfew and complete lockdown in Pune). पुण्यातील मायक्रो कंटेनमेंट भागात असलेल्या झोपडपट्टी भागात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवारपासून (11 मे) 6 दिवस या भागातील सर्व दुकानं बंद राहणार आहेत. त्यामुळे या भागात एकही दुकानं उघडं दिसणार नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दूध किंवा जीवनावश्यक वस्तू घरोघरी देणे, होम डिलिव्हरी करणे असे पर्याय देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुण्यातील मायक्रो कंटेनमेंट भागात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं समोर आलं आहे. याच ठिकाणी रुग्णांचं आणि कोरोना मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच पुणे मनपा प्रशासनाने 11 मे ते 17 मे या 6 दिवसांसाठी या या परिसरात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याची कठोरपणे अंमलबजावणी होणार आहे. शनिवारी (9 मे) या परिसरातील रस्ते पत्रा लावून सील करण्यात आले आहेत. आता त्यानंतर दुकानं बंद ठेवून कोरोना रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सोमवारी (11 मे) सकाळी 11 वाजल्यापासून 14 मेपर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व दुकान बंद राहणार आहेत. दवाखान्यांना यातून सुट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यकता भासल्यास दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पालिका किंवा पोलीस प्रशासन स्थानिक परिस्थिती पाहून घेणार आहे. घरपोच किंवा या क्षेत्राच्या आत मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचा पालन करुन आवश्यकतेनुसार जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करुन दिली जाणार आहे. या भागात शारिरीक अंतराच्या नियमांचं पालन होत नसल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यात आज 102 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 482 वर पोहचली आहे. पुण्यात आज दिवसभरात 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात 145 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यात 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात सर्वाधिक 194 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला.

संबंधित बातम्या :

पुण्यातील वेगवेगळ्या महामार्गांवर मजुरांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था, जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लॉकडाऊनमुळे पुण्यातील प्रदूषणात घट, हवामानाच्या गुणवत्तेत वाढ 

Pune Corona | मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त शेखर गायकवाड

Janta Curfew and complete lockdown in Pune

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.