राज्यातील कारागृहांना कोरोनाचा विळखा, 655 कैद्यांसह 211 कर्मचाऱ्यांना बाधा
राज्यातील कारागृहात आतापर्यंत 655 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली (Maharashtra Prison Prisoners Corona Positive) आहे.
पुणे : राज्यातील कारागृहाच्या अभेद्य भिंती ओलांडून कोरोनानं शिरकाव केला (Maharashtra Prison Prisoners Corona Positive) आहे. राज्यातील कारागृहात आतापर्यंत 655 कैद्यांना कोरोना बाधा झाली आहे. तर 446 कैदी कोरोनामुक्त झाले आहे. तर चार कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर जेल स्टाफमधील 211 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 164 कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अंतर्गत तात्पुरत्या कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांचा कोरोनापासून बचावासाठी तात्पुरतं कारागृह तयार करण्यात आलं आहे. या कारागृहात 17 कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका कोरोना बाधित कैद्याचा मृत्यू झाला आहे. तर कारागृह स्टाफमधील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्याचसोबतच अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक कार्यालयात ही कोरोना रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एक कर्मचारी कोरोनामुक्त झाला. माञ येरवडा मध्यवर्ती कारागृह कोरोनापासून अद्याप दूरच आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
राज्यातील महत्वाच्या कारागृहातील कैदी आणि कर्मचारीही कोरोनाग्रस्त झाले आहेत. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील 182 कैद्यांना आतापर्यंत कोरोना झाला आहे. 180 बाधित कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. तर कारागृहाच्या 46 कर्मचाऱ्यांना बाधा झाली असून 44 कोरोना मुक्त झाले आहेत.
तर ठाणे मध्यवर्ती कारागृहात चार कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील तीन कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. तर कारागृहातील 31 कर्मचाऱ्यांपैकी 19 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.
तर येरवडा मध्यवर्ती कारागृहात 17 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका कोरोनाबाधित कैद्याचा मृत्यू झाला आहे. तर कारागृह स्टाफमधील तिघांना कोरोनाची बाधा झाली.
सातारा जिल्हा कारागृहातील 13 कैद्यांना कोरोना झाला होता. सुदैवाने हे सर्व कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापूर जिल्हा कारागृहातील 62 बाधित कैद्यांपैकी सर्वजण कोरोनामुक्त झाले (Maharashtra Prison Prisoners Corona Positive) आहेत.
त्यानंतर औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात 30 कोरोनाग्रस्त कैद्यांपैकी 26 कोरोनामुक्त झाले आहेत. तर 34 बाधित कर्मचाऱ्यांपैकी 25 कोरोनामुक्त झाले आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील 18 कैद्यांना तर दोन कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. उस्मानाबाद जिल्हा कारागृह 18 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कारागृहाच्या सहा कर्मचाऱ्यांना बाधा झाली.
राज्यात सर्वाधिक प्रादुर्भाव हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात झाला आहे. यात 219 कैद्यांना कोरोना बाधा झाली आहे. यातील केवळ 77 कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. तर बाधित 59 कारागृह कर्मचाऱ्यांपैकी 55 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.
तर अकोला जिल्हा कारागृहातील 72 कोरोनाग्रस्त कैद्यांपैकी 72 कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन बाधित कारागृह कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी कोरोनामुक्त (Maharashtra Prison Prisoners Corona Positive) झाले.
संबंधित बातम्या :
नागपूर आयुक्त तुकाराम मुंढेंपाठोपाठ महापौरही रस्त्यावर, नियम तोडणाऱ्यांचा फैसला ‘ऑन द स्पॉट’
Fauzia Khan | राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण