पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर आता परप्रांतिय नागरिक पुन्हा पुण्यात येऊ लागले आहेत. पुण्यात 1 जूनपासून आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधून 5 हजार 700 प्रवासी पुण्यात आलेत (Bihar Migrant labour returning to Pune)

पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 7:04 PM

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर आता परप्रांतिय नागरिक पुन्हा पुण्यात येऊ लागले आहेत. पुण्यात 1 जूनपासून आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधून 5 हजार 700 प्रवासी पुण्यात आलेत (Bihar Migrant labour returning to Pune). बिहारमधून साधारण 2 हजार प्रवासी पुण्यात आले आहेत. 5 जूनला बिहारमधून पुण्यात पहिल्या ट्रेनचं आगमन झालं. गेल्या 4 दिवसांपासून बिहारमधून परप्रांतीय नागरिक येत आहेत. यातील अनेक जण परप्रांतीय मजूर आहेत.

मध्यंतरीच्या काळात परप्रांतीय मजुरांच्या मुद्द्यावरुन राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानं अनेक उद्योगधंदे सुरु झाले आहेत. त्यामुळे गावी गेलेले मजूर पुन्हा पुण्यात येत असल्याचे दिसतं आहे. बिहारमधून सकाळी साडेपाच वाजता ट्रेन पुण्यात दाखल होते. या ट्रेनमधून रोज साधारण 400 परप्रांतिय पुण्यात येतात. बिहारमधून पहिल्या दिवशी 586, दुसऱ्या दिवशी 476, तिसऱ्या दिवशी (7 जून) 385 आणि चौथ्या दिवशी (8 जून) 316 प्रवासी पुण्यात आले.

पुण्यातून बिहारसाठी दानापूर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आहे. तर मुंबईतून पुणे मार्गे गदग एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या धावतात. या रेल्वे 1 जूनपासून धावत आहेत. पुण्यात आलेल्या परप्रांतीय नागरिकांची रेल्वे स्थानकावर वैद्यकीय तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथकं आणि महसूल पथक 24 तास तैनात करण्यात आले आहे. फ्लू सदृश्य लक्षणं आढळल्यास प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तर उर्वरित प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानंतर संबंधितांना 14 दिवस होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात येत आहेत. या सर्व प्रवाशांना पीएमपीएलच्या बसमधून घरी पोहोचवलं जात आहे.

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले

दरम्यान, लॉकडाऊनमधील शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत असल्याचं चित्र आहे. (migrant workers returning Mumbai) कारण अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेंमधून अंदाजे 20 हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत. कोरोना संकटामुळे लॉकडाऊनदरम्यान परप्रांतिय मजूर आपआपल्या गावी गेले होते. मात्र हळूहळू ते पुन्हा परतू लागल्याचं चित्र आहे.

वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही 01094 क्रमांकाची रेल्वे काल 7 जूनला मुंबईत निर्धारित वेळेत पोहोचली. या रेल्वेने 594 प्रवासी मुंबईत आले. यापैकी 163 कल्याण, 198 ठाणे, 210 दादर आणि 23 प्रवासी सीएसएमटीवर उतरले. या स्थानकांवर संबंधित मनपा, जसे कल्याण डोंबिवली, ठाणे आणि बीएमसीने सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करुन, होम क्वारंटाईनचा शिक्का मारला.

3 जून ते 7 जून या चार दिवसात जवळपास 20 प्रवासी रेल्वेने मुंबई आणि उपनगरात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने आतापर्यंत 60 गाड्या सोडल्या. या विशेष रेल्वेमधून जवळपास 20 हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले. तर पुण्यात तीन रेल्वे दाखल झाल्या असून, तिथे 1200 प्रवासी उतरले.

संबंधित बातम्या :

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले, परप्रांतिय मजूर परतण्यास सुरुवात?

त्र्यंबकेश्वरमध्ये कंत्राटी कामगारांचं स्वत:ला कमरेपर्यंत गाडून घेत आंदोलन

Bihar Migrant labour returning to Pune

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.