पुण्यात क्वारंटाईन केंद्रातील महिलेचा विनयभंग, आरोपी सुरक्षारक्षकाला अटक
पुण्यात क्वारंटाईन केंद्रात तेथील सुरक्षारक्षकानेच एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Molestation of Women in Pune Quarantine Centre).
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्रात तेथील सुरक्षारक्षकानेच एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Molestation of Women in Pune Quarantine Centre). संबंधित सुरक्षारक्षकाने या महिनेला वारंवार मिस्ड कॉल, अश्लील फोन-मेसेजस करुन मानसिक त्रास दिला. तसेच रात्रभर खोलीचा दरवाजाही ठोठावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्र आहे. या ठिकाणी महिलांनाही क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूकही करण्यात आली. मात्र, सध्या या क्वारंटाईन केंद्रातील महिला कक्षात ही महिला एकटीच उपचार घेत होती. याचाच फायदा घेऊन महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच या महिलेचा विनयभंग केला. यामुळे एकच खळबळ उडाली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
संबंधित सुरक्षारक्षकाने महिलेला मध्यरात्रीच्या वेळी त्रास दिला. 16 जुलै रोजी लोकेश मते हा सुरक्षा रक्षक मध्यरात्रीच्या वेळी क्वारंटाईन केंद्रातील महिला कक्षात गेला. तेथे आपण सुरक्षेच्या कारणास्तव असल्याचे सांगून महिला रुग्णाचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याने या महिलेला मिस कॉल केला. काही वेळाने त्याने आपल्याला काही अडचण असल्यास सांगा असा मेसेज टाकून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच फोनवर अश्लील शब्दात बोलण्यास सुरुवात केल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. आरोपीने सकाळपर्यंत खोलीचा दरवाजा ठोठावून त्रास दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे.
यामुळे संबंधित महिला प्रचंड घाबरली. आरोपीने पीडित महिलेला वारंवार मिस्ड कॉल दिला. तसेच फोन करुन अश्लीलपणे बोलला. यानंतर रात्रभर महिला थांबलेल्या खोलीचा दरवाजा देखील ठोठावला. यानंतर अखेर 27 वर्षीय पीडित महिलेने पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षरक्षकाची तक्रार केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाला अटक आहे. लोकेश मते असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
संबंधित व्हिडीओ:
हेही वाचा :
Maharashtra Corona Update | पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
Pune Police | पोलिसांनी गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या, 86 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त
Molestation of Women in Pune Quarantine Centre