मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल महागला, टोल दरात तब्बल 40 ते 122 रुपयांची वाढ

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार (Mumbai Pune Express Way Toll rate Increases) आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल महागला, टोल दरात तब्बल 40 ते 122 रुपयांची वाढ
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 3:43 PM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वत्र लॉकडाऊन करण्यात (Mumbai Pune Express Way Toll rate Increases) आलं आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प आहे. मात्र असे असतानाही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र नुकतंच मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कार किंवा जीपसाठी 230 ऐवजी 270 रुपये मोजावे लागणार आहे. तर मिनी बसला 355 ऐवजी 420 रुपये द्यावे लागणार आहेत.

तर मोठ्या लक्झरी बससाठी 675 ऐवजी 797 रु. टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांचे टोल दर हे 40 ते 122 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोल दर महाग झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर 18 टक्के टोल दरवाढ ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक (Mumbai Pune Express Way Toll rate Increases) आहे. त्यामुळे ही वाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली.

“मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरांमध्ये 18% ने वाढ झाली आहे. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचे ठरले होते. मात्र यामागचं गृहीतक होतं की या रस्त्यावरील ट्रॅफिक दरवर्षी 5% ने वाढेल. 2004 ते 2019 या काळात या हिशोबाने कंत्राटदाराला 2869 कोटी रुपये मिळणार असे गृहीत धरून कंत्राट केले गेले.

मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्याला 4369 (1500 कोटी जास्त) रुपये मिळाले. (अर्थात ते कंत्राटदारांच्या खिशात गेल्याने शासनाला काही मिळाले नाही). ही वस्तुस्थिती असताना परत जुन्याच गृहितकावर आधारीत (5% वर्षाला ट्रॅफिक वाढ) ठरवलेली 18 % टोल दरवाढ अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे, असे विवेक वेलणकर म्हणाले.

नवीन कंत्राट गेल्याच महिन्यात झाले आहे. त्यावेळी या सर्व बाबी विचारात घेऊन कंत्राट करणे आवश्यक होते. आता परत हे कंत्राट दहा वर्षांचे केले असल्याने आता त्यात बदल करणे शक्य नाही असे सांगून शासन आणि प्रशासन हात झटकून मोकळे होईल.

कोरोनाच्या संकटामुळे भविष्यात कोणते आर्थिक संकट उभे राहील या विवंचनेत असणाऱ्या व्यापार, उद्योग आणि सामान्य माणसाला ही टोलदरांमधील जाचक दरवाढ डोईजड होणार आहे. या विषयावर सगळेच राजकीय पक्ष मूग गिळून बसले आहेत,” असे अनेक प्रश्नही विवेक वेलणकर यांनी उपस्थित (Mumbai Pune Express Way Toll rate Increases) केले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.