Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Down | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला

राज्यात जमावबंदीचे आदेश देऊन 24 तासही (Mumbai Pune Express way closed) उलटले नसताना मुंबई-पुण्यातील अनेक लोक कामानिमित्ताने बाहेर पडले.

Lock Down | 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 1:41 PM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस (Mumbai Pune Express way closed) वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लोकांनी ठिकठिकाणी गर्दी करु नये म्हणून जमावबंदीचे आदेशही देण्यात आले. पण मुंबई पुण्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुलुंड टोल नाका, सायन, नवी मुंबई यासह अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद ठेवण्यात आला.

राज्यात जमावबंदीचे आदेश देऊन 24 तासही (Mumbai Pune Express way closed) उलटले नसताना मुंबई-पुण्यातील अनेक लोक कामानिमित्ताने बाहेर पडले. त्यामुळे अनेक टोलनाक्यांवर वाहनांची प्रचंड वाहनांची गर्दी पाहायला मिळाली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद

जमावबंदीमुळे सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर टोल नाक्यावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक खासगी वाहन आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर बॅरेकेट्स लावून एक्सप्रेस वे वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्यात लोकांनी येऊ नये यासाठी हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

दरम्यान पुणे शहरात जमावबंदीचे आदेश असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर गर्दी होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून दुपारी 3 वाजल्यांपासून शहरातील वाहन बंदी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलीस प्रशासनाची महत्वाची बैठक सुरु आहे.

मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

तर ठाणे-कल्याणमधील अनेक लोक मुंबईच्या दिशेने खासगी वाहनांनी निघाले. त्यामुळे मुलुंड टोलनाक्यावर सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

दरम्यान ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोलीमध्ये ट्राफिक पोलिसांनी वाहतूक अडवली. मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कंळबोलीमध्ये अडवण्यात आली.

टोलनाक्यांवरील गर्दी कमी करण्याचे आदेश

मात्र मुंबई पोलिसांनी सजग राहत जे लोक अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडत आहेत. तर इतर गाड्यांना परत माघारी पाठवत आहे. मुंबईतील सर्व टोलनाक्यांवरील गर्दी लवकरात लवकर कमी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Mumbai Pune Express way closed) सांगितलं.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.