‘चंद्रकांत पाटलांनी बारामतीतून निवडणूक लढून दाखवावी’

चंद्रकांत पाटलांनी आगामी विधानसभा निवडणूक बारामतीतून लढवून दाखवावी, असे थेट आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहे. आता चंद्रकांत पाटील हे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘चंद्रकांत पाटलांनी बारामतीतून निवडणूक लढून दाखवावी’
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 1:30 PM

पुणे: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. लोकसभा निवडणुकीत तर ते बारामतीतच तळ ठोकून होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी चंद्रकांत पाटलांना आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील अंकुश काकडेंचे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. काकडे म्हणाले, “देशात नवे सरकार आले, राज्यातही निवडणुका होत आहेत. मात्र, भाजप नेत्यांना देशात गांधी घराणे आणि राज्यात पवार घराणे  याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. ते उठसुट पवारांवरच टीका करतात, त्यांच्यापुढे इतर कुठलेही प्रश्न शिल्लक राहिलेले दिसत नाही. राज्या दुष्काळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आरक्षण असे महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे असताना यांना फक्त बारामतीची काळजी आहे.” यावेळी काकडेंनी चंद्रकांत पाटलांना लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगली चपराक लगावल्याचे म्हटले. तसेच ही चपराक झोंबल्यानेच त्यांनी अजित पवारांची सुपारी घेतली आहे, असाही आरोप केला.

चंद्रकांत पाटील विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघातून विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला कोटाही पूर्ण न करु शकणारे आमदार आहेत, असे म्हणत काकडेंनी चंद्रकांत पाटलांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटलांनी बारामतीटा विषय सोडून द्यावा असे सांगताना ते शक्य नसेल तर बारामतीतून निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. ते म्हणाले, “अजित पवारांचे काय करायचे ते बारामतीची जनता ठरवेल. त्याची उठाठेव चंद्रकांत पाटलांनी ठेऊ नये. त्यानंतरही ही उठाठेव करायची असेल, तर त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी. एकदा होऊन जाऊ द्या, “दुध का दुध, पाणी का पाणी”.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.