कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनानमुळे निधन (Sharad Pawar visit Datta Sane House) झाले.

कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 12:28 PM

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनानमुळे निधन (Sharad Pawar visit Datta Sane House) झाले. साने यांच्या निधनानंतर आज (7 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवड येथे साने यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले (Sharad Pawar visit Datta Sane House). यावेळी शरद पवार यांनी दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

नगरसेवक दत्ता साने यांचा 4 जुलै रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं आढळली होती. तेव्हापासून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. याच दरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना त्यांना कोरोना संसर्ग झाला होता.

पुण्यासह जिल्ह्यातील इतर भागात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, पुणे जिल्ह्यात काल (6 जुलै) दिवसभरात 1245 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहते. जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार 844 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात दिवसभरात 21 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 890 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे महानगर पालिका क्षेत्रात काल दिवसभरात 861 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत तब्बल 22 हजार 381 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 15 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत तब्बल 730 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय

पुण्यात तीन लाखांहून अधिक उद्योग सुरु, कंपन्यांचे 30 ते 70 टक्के क्षमतेने काम सुरु

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.