कोरोनाची मुंबईत एन्ट्री, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 7 वर पोहोचली आहे (Number of Corona Patient in Maharashtra). आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाची मुंबईत एन्ट्री, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 7:54 PM

पुणे : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 7 वर पोहोचली आहे (Number of Corona Patient in Maharashtra). आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत विमानात प्रवास करणाऱ्या दोघांना लागण झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतानाच दिसत आहे.

पुण्यात दुबईहून आलेल्या दाम्पत्यानंतर त्यांच्यासोबतच्या आणखी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काल उघड झालं होतं. त्यानंतर आज आणखी दोन सहप्रवासीही बाधीत झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

आतापर्यंत 7 रुग्ण पाझिटिव्ह

दुबईहून आलेले पुण्यातील दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय हे दाम्पत्या मुंबईहून पुण्याला ज्या टॅक्सीने गेले, त्या टॅक्सीचालकालाही कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आता आणखी दोन सहप्रवाशांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर पोहोचली आहे.

कोरोनाचा झपाट्याने होणारा हा संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरु असून प्रकृती स्थिर आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याही तपासण्यात करण्यात येत आहेत.

पुण्यातील रुग्णांच्या मुंबईतील 2 सहप्रवाशांना कोरोनाचा संसर्ग

दुबईतून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या सहप्रवाशांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु आहे. या रुग्णांसोबतचे मुंबईतील 2 सहप्रवासी देखील आज कोरोनाबाधित असल्याचा निर्वाळा कस्तूरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 7 झाली आहे.

11 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1995 विमानांमधील 1,38.968 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सुचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याशिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 635 प्रवासी आले आहेत.

पुण्यात कोरोना 18 संशयित, तर मुंबईत 15 जण भरती

18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 349 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व 312 जणांचे प्रयोगशाला नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 349 प्रवाशांपैकी 312 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या 18 जण पुण्यात, तर 15 जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेड उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहेत. त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.

मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या जगातील 12 देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 635 प्रवाशांपैकी 370 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण अंत्यवस्थ नाही : राजेश टोपे

कोरोनाबाबत जास्त काळजी करु नये. मात्र सतर्कता बाळगावी. आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली झाली तर आपोआप या आजारातून सूटका होते. या आजारातील मृत्यूदर 2.5 टक्के आहे. या आजाराचे अद्याप एकही रुग्ण महाराष्ट्रात क्रिटिकल नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. शाळांच्या बाबतीतही चर्चा झाली. याबाबच सर्व तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यामध्ये हिंदूजा, जसलोक, लिलावती अशा विविध रुग्णालयाचे तज्ज्ञ होते. शाळांना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही. त्याने भितीचे वातावरण वाढेल. त्यामुळे तूर्तास कोणत्याही शाळेला सुट्टी दिली जाणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे म्हणाले, “मुंबईत दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते वीणा वर्ल्डसोबत दुबईला गेलेल्या गटातीलच सदस्य आहेत. पुण्यातील जे 4 रुग्ण आहेत त्यांच्यासोबत आणखी 2 जणांची संख्या वाढली आहे. याशिवाय आणखी एका रुग्णामध्ये अशी लक्षणं दिसून आली आहेत. मात्र, तो बाधित नाही. त्याचीही तपासणसी करण्यात आली आहे.”

Number of Corona Patient in Maharashtra

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.