Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने दुबईला पळ, कोरोनाग्रस्त महिलेवर हिंजवडीत गुन्हा

हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269, 270 तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा ह्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने दुबईला पळ, कोरोनाग्रस्त महिलेवर हिंजवडीत गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 9:18 AM

पिंपरी चिंचवड : केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने होम क्वारंटाईनच्या आदेशाचं उल्लंघन करुन दुबईला निघून गेलेल्या पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्त महिलेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpari Woman booked for running away to Dubai breaking Home Quarantine rules)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा, तसेच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269, 270 तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा ह्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

संबंधित 30 वर्षीय महिलेने शनिवार 11 जुलैला पिंपरी-चिंचवडमध्ये आदित्य बिर्ला रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी 12 जुलैला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिला कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे तिने गृह विलगीकरणात राहू देण्याची विनंती केली होती. त्यानुसार तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

मेडिकलमध्ये जात असल्याचे सांगून 17 जुलैच्या रात्री महिला सोसायटीच्या बाहेर पडली. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती परत आली नाही. त्यानंतर तिने थेट दुबईला पळ काढला. विशेष म्हणजे दुबईला पोहोचल्यानंतर संबंधित महिलेने शारजा विमानतळावरुन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा मेसेज सोसायटीतील सदस्यांना पाठवला.

सोसायटीच्या सदस्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार दिली. मात्र त्या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा सोसायटीने केला होता. त्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने तक्रार केली आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. काल (20 जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये 987 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 11 हजार 494 वर पोहोचला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 11 कोरोनाबळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 209 वर पोहोचली

संबंधित बातमी

होम क्वारंटाईनमधील कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईत, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

(Pimpari Woman booked for running away to Dubai breaking Home Quarantine rules)

बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...