पिंपरी चिंचवड | कोरोना रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर, कोणत्या प्रभागात किती?
गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरातील 37 तर शहराबाहेरील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. (Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 391 वर पोहोचली आहे. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी परिसराचा समावेश असलेल्या ‘अ’ प्रभागात सध्या सर्वाधिक म्हणजे 154 कोरोनाग्रस्त आहेत. (Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)
गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरातील 37 तर शहराबाहेरील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तर शहराबाहेरच्या कोरोनाग्रस्त रुग्णाला प्राण गमवावे लागले.
आतापर्यंत शहरातील 391 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या 213 आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी चिंचवड शहराबाहेरील 49 जणांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर शहराबाहेरील एकूण 17 रुग्ण घरी गेले आहेत.
आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर शहराबाहेरील 10 जणांनी प्राण गमावले आहेत. एकूण 17 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात दाखल रुग्णांची आकडेवारी
1) प्रभाग अ -निगडी, प्राधिकरण, आकुर्डी- 154
2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- 08
3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी- 04
4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे-14
(Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)
5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली- 12
6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली- 07
7) प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी – 09
8) प्रभाग ह – दापोडी, कासरवाडी, सांगवी – 05
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : सोमवार, २५ मे,२०२०
शहरात आज नव्याने ३६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३९० झाली आहे. आजवर एकूण १७० कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या २१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण ७ मृत्यू आजवर झाले आहेत.#PCMCFightsCorona pic.twitter.com/SwDyYXxt8F
— Mai Dhore (महापौर, पिंपरी-चिंचवड) (@mai_dhore) May 25, 2020
(Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)