पिंपरीत कोरोनाबाधित अंडी विक्रेत्याचा 85 किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क, 181 जण क्वारंटाईन

पिंपरी-चिंचवड परिसरातील एक अंडीविक्रेता कोरोनाबाधित (Pimpri egg seller corona Positive) आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पिंपरीत कोरोनाबाधित अंडी विक्रेत्याचा 85 किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क, 181 जण क्वारंटाईन
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 12:50 PM

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील एक अंडीविक्रेता कोरोनाबाधित (Pimpri egg seller corona Positive) आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अंडीविक्रेत्याने जवळपास 85 किरकोळ विक्रेत्यांना अंडीविक्री केली. इतकंच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 181 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Pimpri egg seller corona Positive)

हा कोरोनाबाधीत अंडीविक्रेता पिंपरी-चिंचवडमधील उपनगरात अंड्यांची विक्री करत होता. त्याने कुठल्या कुठल्या भागात अंडीविक्री केली त्याचा तपास चाकण नगरपालिका प्रशासनाने घेतला. त्यामध्ये या विक्रेत्याने चाकणच्या नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी या भागात तब्बल 85 किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांची विक्री केल्याची बाब समोर आली.

हेही वाचा : पुण्यातील ‘ही’ पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चित

त्यामुळे चाकण नगरपालिका वैद्यकीय विभागाने तब्बल 85 किरकोळ अंडी विक्रेता आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे एकूण 181 जणांना तात्काळ होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चाकण नगरपालिकेने शहरातील 81 अंड्यांची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आणखी किती जणांना या कोरोनाबाधित विक्रेत्याने अंडी विकली आहेत, त्याचा तपास चाकण नगरपालिका तसेच चाकण पोलीस प्रशासन करत आहेत.

पुण्यात कोरोनाची वाढती संख्या

पुण्यात शिक्रापूर परिसरामध्ये 144 गर्भवतींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आल्यामुळे या गरोदर महिलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. (Pune 144 Pregnant Women Quarantine)

पुण्यात दिवसेंदिवस ‘कोरोना’चा विळखा वाढताना दिसत आहे. शिक्रापूर परिसरात असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर आजूबाजूचा गावातील गरोदर महिला नियमित तपासणीसाठी जात होत्या. मात्र इथे रेडिओलॉजिस्ट असलेल्या व्यक्तीला ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं.

पुण्यात काल कोरोनाचे 65 नवे रुग्ण आढळले आहेत. ससून हॉस्पिटलमधल्या 3 नर्सेससह 21 जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. आता पुण्यातली एकूण रुग्णसंख्या 343 वर पोहोचली आहे. पुण्यात कोरोनाचे आतापर्यंत 35 बळी गेले आहेत.

संबंधित बातम्या  

सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन   

पुण्यात कर्फ्यूच्या व्याप्तीत वाढ, 28 नवीन भागात संचारबंदी, कुठे-कुठे कर्फ्यू लागू? 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.