नियमांचे पालन न केल्यामुळे पुण्यातील 9 दारुच्या दुकांनावर गुन्हे दाखल
राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने राज्यावर आता आर्थिक संकट येण्याची शक्यता (Pune Police action on Wine shops) आहे.
पुणे : राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने राज्यावर आता आर्थिक संकट येण्याची शक्यता (Pune Police action on Wine shops) आहे. त्यामुळे 3 मे नंतर राज्य सरकारने तिन्ही झोनमध्ये मद्य विक्रीस परवानगी दिली होती. पण पुण्यातील मद्य विक्री दुकानांनी दारु विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण 9 दारुच्या दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली (Pune Police action on Wine shops) आहे.
ही दुकानं विश्रामबाग, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7 दुकानं आहेत. परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आदी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. मात्र दुकान मालकांनी दिलेल्या नियम आणि अटींचे भंग करून कोरोनाचा संसर्ग पसरवण्याची कृती केली आहे.
नाशिक पोलिसांकडून वाईन शॉप बंद करण्याचा निर्णय
महाराष्ट्रात कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही मद्यविक्रीला 4 मेपासून सशर्त परवानगी मिळाली होती. त्यामुळे राज्यभरातील वाईन शॉप्सवर तळीरामांनी सकाळपासून गर्दी केली होती. दारु खरेदीसाठी रांगा वाढल्याने पोलीस आयुक्तांनी सर्व वाईन शॉप्स बंद करण्याचा निर्णय घेतला.
नाशिक शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करत वाईन शॉप सुरु होते. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील वाईन शॉप्स बंद राहतील, असे फर्मान नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काढले आहेत.
मुंबईत दारुची दुकानं पुन्हा बंद
लॉकडाऊनचे नियम शिथील करत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 4 मेपासून रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबईकरांकडून शिस्त पाळली गेली नाही. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत अनेक भागांमध्ये दारुची दुकानं सुरु झाली. मात्र, दारु घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. अखेर मुंबई महापालिकेने कडकडीत संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील दारुची दुकानंदेखील बंद राहणार आहेत.
संबंधित बातम्या :
Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय
Karnataka Liquor : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री