बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

पाषाणकर यांना कोल्हापूरपर्यंत नेण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात निदर्शनास आली आहे. | Gautam Pashankar

बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 9:43 AM

पुणे: गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ( Gautam Pashankar is traced to Kolhapur but to be found)

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली. पाषाणकर यांना कोल्हापूरपर्यंत नेण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात निदर्शनास आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून गौतम पाषाणकर यांचा कसून शोध घेतला जात आहे. पाषणकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक शहर आणि जिल्ह्याबाहेरही पाठवण्यात आले आहे.

गौतम पाषाणकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठं नाव आहे. गेल्या 21 दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर बेपत्ता झाले होते. पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांचे नातेवाईक आणि कार चालकाची चौकशी करत आहेत. पाषाणकर कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला 9822474747 या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला 020-25536263 या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट

गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला होता.

गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

गौतम पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी आपल्या वडिलांच्या अपहरणामागे राजकीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी कपिल पाषाणकर यांनी पोलिसांची अचानकपणे भेट घेतली होती. त्यावेळी कपिल यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा केला होता. तसेच काही राजकीय व्यक्तींचा नावेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या:

Gautam Pashankar | उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ताच, मुलगा कपिल पाषाणकरकडून अपहरणाचा संशय

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन, मुलाकडून धक्कादायक आरोप

जिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक

Gautam Pashankar | उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ताच, पोलिसांच्या 5 पथकांचा कसून शोध सुरु

( Gautam Pashankar is traced to Kolhapur but to be found)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.