प्रवीण गायकवाड खर्गेंच्या भेटीला, पुण्यासाठी दिल्लीत फिल्डिंग
नवी दिल्ली/पुणे: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. कारण प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. राजधानी […]
नवी दिल्ली/पुणे: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. कारण प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
राजधानी दिल्लीत प्रवीण गायकवाड आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट झाली. त्याआधी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती.
शरद पवारांचीही भेट
दरम्यान, प्रवीण गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामतीतील गोविंद बाग या पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनीच राहुल गांधींना पुणे लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांचं नाव सुचवलं होतं. त्याला राहुल गांधी यांनी हिरवा कंदीलही दिला. मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या प्रवीण गायकवाड यांच्यासह बाहेरुन पक्षात आलेल्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी थेट 23 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
प्रवीण गायकवाड बारामतीत, ‘गोविंद बाग’मध्ये शरद पवारांची भेट
आयात नेत्यांना काँग्रेसचा विरोध
पुणे लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीवरुन आजही काँग्रेसमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आयात उमेदवाराला विरोध केला आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दल अजून स्पष्ट भूमिका घेतली नाही.
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्याबाबत काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. मात्र या चर्चेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आयात उमेदवार दिला जाऊ नये अशी एकमुखी मागणी, काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. यापूर्वी बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, अनंत गाडगीळ यांनी आयात उमेदवारी देण्यावर नाराजी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या
पुण्यात प्रवीण गायकवाडांना विरोध, काँग्रेसची डोकेदुखी वाढली
प्रवीण गायकवाड बारामतीत, ‘गोविंद बाग’मध्ये शरद पवारांची भेट
पुण्यात राहुल गांधींनी सुचवलेल्या उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध?
पुणे लोकसभा: भाजपकडून जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ चर्चेत
संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?