Pune Murder | पुण्यात तरुणाला दगडाने ठेचलं, दहा दिवसात कोंढव्यातील तिसरे हत्याकांड
गेल्या दहा दिवसात कोंढवा भागात झालेला हा तिसरा, तर सहा दिवसात पुणे शहरात झालेला हा चौथा खून आहे
पुणे : हत्येच्या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. पुण्यातील कोंढवा भागात दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दहा दिवसातील कोंढवा भागातील हे तिसरे हत्याकांड आहे. (Pune 24 years old Man Killed Third Murder in Kondhwa within 10 Days)
24 वर्षीय विठ्ठल रामदास धांडे याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या वादातून तिघांनी दगडाने मारहाण करत हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
गेल्या दहा दिवसात कोंढवा भागात झालेला हा तिसरा, तर सहा दिवसात पुणे शहरात झालेला हा चौथा खून आहे. पुण्यातील हत्यांचं सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश गुन्हेगारीला कसा आळा घालणार? हा प्रश्न विचारला जात आहे.
पुण्याच्या खराडी भागात कुख्यात गुंडाची दोनच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. मोकळ्या मैदानात दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आलं होतं. गुंड शैलेश घाडगेच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा : पुण्यात थरार! 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या; 3-4 जणांचा जागीच मृत्यू
खराडी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती. शैलेश घाडगे हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी होता. शैलेशच्या नावावर अनेक गुन्हे नोंद होते. (Pune 24 years old Man Killed Third Murder in Kondhwa within 10 Days)
पुणे आयुक्तालयाजवळ गोळीबाराचा थरार
एकीकडे गुंडाच्या हत्येने थरकाप उडाला असताना, पुणे पोलीस आयुक्तालयाजवळही दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. एसबीआय ट्रेझरी कार्यालयासमोर हा फायरिंगचा प्रकार घडला. गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कारhttps://t.co/Y7bS3ulfnE#Hathras
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
संबंधित बातम्या
पुण्यात दगडाने ठेचून गुंडाची हत्या, तर पोलीस आयुक्तालयाजवळही गोळीबाराचा थरार
पुणे : 10 दिवसांत 11 हत्या, पुणे गुन्हेगारीच्या रस्त्यावर
(Pune 24 years old Man Killed Third Murder in Kondhwa within 10 Days)