Corona Lockdown | पुणेकरांना बाहेर पडण्याची खुमखुमी, डिजिटल पाससाठी 91 हजार अर्ज

आतापर्यंत तब्बल 91 हजार 860 जणांनी डिजिटल पाससाठी अर्ज भरुन दिले आहेत. 47 हजार 452 जणांचेचे अर्ज पोलिसांनी नामंजूर केले आहेत (Pune Applications for Digital Pass)

Corona Lockdown | पुणेकरांना बाहेर पडण्याची खुमखुमी, डिजिटल पाससाठी 91 हजार अर्ज
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 11:23 AM

पुणे : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही पुणेकरांना बाहेर पडण्याची खुमखुमी दिसत आहे. पुण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त तब्बल 91 हजारापेक्षा जास्त व्यक्तींनी पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी मागितली आहे. (Pune Applications for Digital Pass)

डिजिटल पासधारकांना संचारबंदीच्या काळातही प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र डिजिटल पाससाठी अनेकांनी दिलेली कारणे पटण्यासारखी नसून वैद्यकीय उपचार हे कारण सर्वाधिक व्यक्तींनी दिलं आहे.

आतापर्यंत तब्बल 91 हजार 860 जणांनी डिजिटल पाससाठी अर्ज भरुन दिले आहेत. 47 हजार 452 जणांचेचे अर्ज पोलिसांनी नामंजूर केले आहेत. ‘केवळ’ 19 हजार 860 जणांचे अर्ज मंजूर करुन त्यांना डिजिटल पास देण्यात आले आहेत.

बहुतेक जणांनी वैद्यकीय उपचार हे कारण दिले आहे. पोलिसांकडे अद्याप 24 हजार 268 अर्ज प्रलंबित आहेत. मात्र पुणेकरांना अशा कोणत्या अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडायचे आहे, हा प्रश्न आहे. (Pune Applications for Digital Pass)

दरम्यान, पुणे शहरात लागू असलेल्या संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने एक एप्रिलला 382 नागरिकांवर कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 1287 नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर 1516 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं पोलिस वारंवार आवाहन करत आहेत.

पुणे शहरातील दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्या दोघांवरही डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे शहरात 33, तर पुणे ग्रामीणमध्ये 07 असे कोरोनाचे 40 रुग्ण झाले आहेत. यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिपरी चिंचवडमध्ये 12 कोरोनाग्रस्त असून यापैकी दहा जण आधीच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 52 वर गेला आहे.

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये तीनने वाढ झाल्यामुळे राज्यातील आकडा 341 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

(Pune Applications for Digital Pass)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.