भवानी पेठेतील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर, पुण्याची प्रभागनिहाय आकडेवारी

'कोरोना'चा हॉटस्पॉट भवानी पेठ परिसरात स्क्रीनिंग सुरु करण्यात आली आहे. संशयित रुग्णांचे तात्काळ निदान होऊन चाचण्या करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. (Pune Bhawani Peth Wardwise Corona Patients)

भवानी पेठेतील 'कोरोना'ग्रस्तांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर, पुण्याची प्रभागनिहाय आकडेवारी
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 10:39 AM

पुणे : पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. बुधवारी तब्बल 55 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पुणे जिल्ह्यात एकूण 437 रुग्ण झाले आहेत. कालच्या दिवसात पुण्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 43 झाला आहे. भवानी पेठेत आतापर्यंत एकूण 96 रुग्ण सापडले आहेत. (Pune Bhawani Peth Wardwise Corona Patients)

पुणे शहरातील पंधरा प्रभागांमधील 386 कोरोनाबाधित रुग्णांचा नकाशाच्या माध्यमातून लेखाजोखा घेण्यात आला आहे. 15 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या वास्तव्यावरुन हा आढावा घेतला आहे.

‘कोरोना’चा ‘डेथ झोन’ ठरलेल्या भवानी पेठेची रुग्णसंख्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. एकट्या भवानी पेठेतच एकूण 96 रुग्ण सापडले आहेत.

‘कोरोना’चा हॉटस्पॉट भवानी पेठ परिसरात स्क्रीनिंग सुरु करण्यात आली आहे. संशयित रुग्णांचे तात्काळ निदान होऊन चाचण्या करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. आवश्यकता असल्यास जागेवरच नागरिकांच्या घशातील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

डॉक्टर, परिचारिका अन्य दोन सहकाऱ्यांसह चौघांच्या 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत. स्क्रीनिंग करताना पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. झोपडपट्टी आणि पेठांचा परिसर असल्याने इथे लोकसंख्या जास्त आहे.

ढोले पाटील रोड भागात 48, तर कसबा–विश्रामबागवाडा परिसरात आतापर्यंत 45 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोथरुड–बावधन भागातील रुग्णसंख्या एकवर थोपवून धरण्यात यश आलेलं आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या 

औंध – बाणेर – 3 कोथरुड – बावधन – 1 सिंहगड रोड – 8 वारजे कर्वेनगर – 9 शिवाजीनगर – घोलेरोड – 27 कसबा – विश्रामबागवाडा – 45 धनकवडी – सहकारनगर – 26 भवानी पेठ – 96 बिबवेवाडी – 15 ढोले पाटील रोड – 48 येरवडा – धानोरी – 33 नगररोड – वडगावशेरी – 5 वानवडी – रामटेकडी – 22 हडपसर – मुंढवा – 21 कोंढवा – येवलेवाडी – 9 पुण्याबाहेरील रुग्ण – 18

(Pune Bhawani Peth Wardwise Corona Patients)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.