Pune Budhwar Peth | बुधवार पेठेत कोरोनाची एन्ट्री, गर्भवतीसह पाच जणांना कोरोना

बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय परिसरात असलेल्या दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना चाचणी शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली.

Pune Budhwar Peth | बुधवार पेठेत कोरोनाची एन्ट्री, गर्भवतीसह पाच जणांना कोरोना
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 10:49 AM

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या रेडलाईट एरियामध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिला, तर तीन पुरुषांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Pune Budhwar Peth Red Light area women found corona positive)

पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन यांचे नियोजन, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे आतापर्यंत पुणे शहरातील रेड लाइट एरियात ‘कोविड19’चा संसर्ग झाला नव्हता. गेले चार महिने या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.

बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय परिसरात असलेल्या दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना चाचणी शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली. काळजीची बाब म्हणजे पॉझिटिव्ह महिलांमध्ये चार महिन्यांच्या गर्भवतीचाही समावेश आहे.

दोन्ही महिला वेश्या व्यवसाय करतात, तर पुरुष त्याच भागातील फेरीवाले असल्याची माहिती आहे. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर इथल्या महिलांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटला होता. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने रेड लाईट एरिया पुन्हा सील होण्याची भीती महिलांना सतावत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

गेले चार महिने पुण्यालाही कोरोनाने विळखा घातला आहे. मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अशाही परिस्थितीत बुधवार पेठेत कोरोनाचा शिरकाव न झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते. परंतु इथल्या सेक्स वर्कर महिलांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

काही सेवाभावी संस्थांच्या वतीने सेक्स वर्कर महिलांना अन्नधान्य दिले जात आहे. परंतु लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आम्हाला महिन्याला 3 ते 5 हजार मासिक भत्ता देण्याची मागणी या महिलांनी केली आहे. यासंदर्भात काही एनजीओच्या माध्यमातून गेल्या महिन्यात पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

(Pune Budhwar Peth Red Light area women found corona positive)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.