मुलीचे कोरोनाने निधन, डीएसके पत्नी मुलासह काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार

डी एस कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी देशपांडे यांचे गेल्या आठवड्यात पुण्यात कोरोनामुळे निधन झाले.

मुलीचे कोरोनाने निधन, डीएसके पत्नी मुलासह काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 7:50 AM

पुणे : सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी उर्फ डीएसके, त्यांच्या पत्नी आणि मुलगा यांना रविवारी काही काळासाठी जेलबाहेर पाठवले जाणार आहे. कन्येच्या अंत्यविधीसाठी कुलकर्णी कुटुंबाला मुभा देण्यात आली आहे. (Pune Builder DSK to come out of Jail to perform last rites of daughter)

डी एस कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी देशपांडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. कोरोनाच्या संसर्गानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

मुलीच्या तेराव्याचे विधी करण्यासाठी डी. एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना न्यायालयाने काही तासांसाठी दिली परवानगी दिली आहे. अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी (16 ऑगस्ट) त्यांना तुरुंगातून काही वेळासाठी सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा : बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…

अश्‍विनी देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्यांच्याबरोबर कोणी नव्हते. त्यांच्या तेराव्याच्या विधीसाठी डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी यांना परवानगी देण्यात यावी, यासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने डीएसकेंसह त्यांच्या पत्नी व मुलास त्यानुसार काही तासांसाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली. पोलिस बंदोबस्त आणि कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत.

डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. (Pune Builder DSK to come out of Jail to perform last rites of daughter)

गुंतवणूकदारांची दोन हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि इतर सहकारी तुरुंगात आहेत. तर डीएसकेंचा भाऊ मकरंद हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. पण ऑगस्ट 2019 मध्ये दुबईला पळून जाताना त्याला पोलिसांनी पकडलं.

(Pune Builder DSK to come out of Jail to perform last rites of daughter)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.