पुण्यात ‘कोरोना’चा विळखा घट्ट, आणखी 22 ठिकाणे होणार सील, वाचा संपूर्ण यादी

पोलिस यंत्रणेकडून पुणे महापालिकेला अहवाल प्राप्त झाल्यावर लागलीच 22 ठिकाणे सील करण्यात येतील (Pune Corona Affected parts to be sealed)

पुण्यात 'कोरोना'चा विळखा घट्ट, आणखी 22 ठिकाणे होणार सील, वाचा संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 8:13 AM

पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महापालिका आणखी 22 भाग सील करणार आहे. महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून 22 वस्त्यांची यादी सोबत दिली आहे. पर्वती दर्शन परिसर, कोंढवा खुर्द अशा भागांचा यात समावेश आहे. (Pune Corona Affected parts to be sealed)

महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर केला आहे. हे भाग पूर्णपणे सील करण्यापूर्वी आवश्यक पोलिस बळ उपलब्ध आहे का, याची चाचपणी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. पोलिस यंत्रणेकडून याबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर लागलीच हा निर्णय होईल.

पुण्यात कोरोनाचा फैलाव अजून वाढला असून काल एका दिवसात 41 नवे रुग्ण आढळले. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे. सोमवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

‘ही’ 22 ठिकाणे होणार सील

* प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन क्र. 1 ते 48, ताडीवाला रोड प्रभाग क्र. 20 * संपूर्ण ताडीवाला रोड * घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. 2 * राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅँड, संत कबीर, एडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र. 20 * विकासनगर, वानवडी गाव * लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड * चिंतामणी नरगर, हांडेवाडी रोड, प्रभाग क्र. 26 व 28 * घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड * संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. 8 * सय्यदनगर, मह्ममदवाडी हडपसर प्रभाग क्र. 23, 24 व 26 * पर्वती दर्शन परिसर (Pune Corona Affected parts to be sealed) * सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, पुणे- मुंबर्स रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे डावी बाजू व उजव्या बाजुस नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे * संपूर्ण पाटील इस्टेट परिसर * संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाक क्र. 7 * एनआयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्र. 26 * संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, साईनगर * वडगाव शेरी परिसर प्रभाग क्र. 5 * धानोरी प्रभाग क्र. 1 * येरवडा प्रभाग क्र. 6 आणि विमानगर प्रभाग क्रमांक 3

हेही वाचापुण्यातील भवानी पेठ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’, 11 रहिवासी दगावले, रुग्णसंख्या 69 वर

(Pune Corona Affected parts to be sealed)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.