Pune Corona | पुण्यात साडे सहा तासात 131 नवे रुग्ण

आज जिल्ह्यात केवळ साडे सहा तासात 131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल रात्री 9 वाजेपासून 180 बाधित रुग्ण वाढले आहेत.

Pune Corona | पुण्यात साडे सहा तासात 131 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 6:18 PM

पुणे : पुण्यात गेल्या साडे सहा तासात 131 नवीन (Pune Corona Cases Increases) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर काल (23 मे) रात्री 9 वाजेपासून ते आतापर्यंत पुण्यात तब्बल 180 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या पुण्यात कोरोनामुळे 265 जणांचा मृत्यू (Pune Corona Cases Increases) झाला आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कंटेनमेंट भाग वगळता इतरत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागल्याचं चित्र आहे.

आज जिल्ह्यात केवळ साडे सहा तासात 131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल रात्री 9 वाजेपासून 180 बाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 616 वर पोहोचली आहे. तर सकाळपासून आतापर्यंत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 265 वर पोहोचला आहे (Pune Corona Cases Increases).

सर्वाधिक जास्त रुग्ण हे पुणे शहराच्या हद्दीतील आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ससून रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू

पुण्यातील ससून रुग्णालयात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात आतापर्यंत 133 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 132 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज रुग्णांपेक्षा मृत्यूंचे प्रमाण जास्त असल्याचं दिसून येत आहे.

Pune Corona Cases Increases

संबंधित बातम्या :

Nagpur Corona | नागपुरात ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ यशस्वी, जवळपास 75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

लॉकडाऊन शब्द वापरु नका, काय उघडत जाणार त्याची यादी देईन, पण एक अट : मुख्यमंत्री

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, एकाच दिवसात राज्यात 87 पोलीस पॉझिटिव्ह

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.