Pune Corona Update | पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 4 हजारांच्या पार, कुठे किती रुग्ण?
पुणे जिल्ह्यात आज 223 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या 4 हजार 18 वर पोहोचली आहे.
पुणे : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे (Pune Corona Cases Update). राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या पार गेला आहे. तर पुणे जिल्ह्यात आज 223 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या 4 हजार 18 वर पोहोचली आहे. तर आज जिल्ह्यात 9 कोरोनाबाधित (Pune Corona Cases Update) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 62 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2,014 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
पुणे जिल्ह्यात 24 तासात किती रुग्ण वाढले?
– पुणे जिल्ह्यात 24 तासात वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 223
– पुणे शहरातील 24 तासात वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 209
– पिंपरी चिंचवड शहरात 24 तासात वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 09
– कंटेनमेंट आणि नगरपालिका क्षेत्रात 24 तासात वाढलेली संख्या : 00
– पुणे ग्रामीणमध्ये 24 तासात वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 06
आज दिवसभरात पुणे जिल्ह्यात झालेल्या मृत्यूंचा तपशील
– पुणे जिल्ह्यात 24 तासात झालेले मृत्यू : 09
– पुणे शहरात 24 तासात झालेले मृत्यू : 09
– पिपरी-चिंचवड शहरात 24 तासात झालेले मृत्यू : 00
– पुणे ग्रामीण (कंटेनमेंट, नगरपालिका) क्षेत्रात 24 तासात झालेले मृत्यू : 00
आज दिवसभरात पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा तपशील
– पुणे जिल्ह्यात 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 62
– पुणे शहरात 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 53
– पिंपरी-चिंचवड शहरात 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 05
– ग्रामीण क्षेत्रात (कंटेनमेंट, नगरपालिका, तालुका हद्दीतील) 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 04
Pimpari Corona | पिंपरीत चिमुकली भावंडे कोरोनामुक्त, दीड महिन्याच्या बाळासह चार वर्षांच्या दादाकडून ‘फाईट’https://t.co/6G9nckYmQR#PuneFightsCovid19 #Pimpari #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी, कुठे किती रुग्ण
– पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 4,018
– पुणे शहरातील रुग्णांची संख्या : 3,517
– पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या : 199
– पुणे ग्रामीण रुग्णांची संख्या : 100
– कंटेनमेंट आणि नगरपालिका हद्दीतील रुग्णांची संख्या : 202
Pune Corona Cases Update
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कुठे किती जणांचा मृत्यू
– पुणे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या : 206
– पुणे शहरातील कोरोनाबळींची एकूण संख्या : 182
– पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबळींची एकूण संख्या : 10
– पुणे ग्रामीण भागातील कोरोनाबळींची एकूण संख्या : 14
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती
– पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 2,014
– पुणे शहरातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या : 1,751
– पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या : 118
– कंटेनमेंट, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीतील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या : 145
राज्यातील स्थिती काय?
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या पार पोहोचला आहे. आज राज्यात सर्वाधिक 2 हजार 347 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 053 वर पोहोचली आहे. राज्यात आज कोरोनाने 63 बळी घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा 1 हजार 198 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढवला
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.
Pune Corona Cases Update
संबंधित बातम्या :
ससून रुग्णालयात तिघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 185 वर
Pune RTO | पुणे जिल्ह्यात सोमवारपासून आरटीओ सुरु, कंटेनमेंट झोनमधील नवीन गाड्यांची नोंदणी होणार नाही