Pune Corona : पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू, बालेवाडीत क्वारंटाईन केलेले 300 पैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह

पुण्यात एका 61 वर्षीय महिलेचा काल रात्री पावणेअकरा वाजता मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती.

Pune Corona : पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू, बालेवाडीत क्वारंटाईन केलेले 300 पैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 1:20 PM

पुणे : देशासह राज्यात कोरोनाचा विळखा वाढतो (Pune Corona Deaths) आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे काल रात्रीपासून ते आतापर्यंत एक स्त्री आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत (Pune Corona Deaths) एकूण 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, बालेवाडी येथे ‘इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन’ केलेल्या 300 जणांपैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पुण्यात एका 61 वर्षीय महिलेचा काल रात्री पावणेअकरा वाजता मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. पुण्यातील पर्वती दर्शन परिसरातील या महिलेला 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काल रात्री त्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला खोकला आणि इतर व्याधी होत्या.

दुसरीकडे, शिक्रापूर येथील चाळीस वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला अनेक वर्षांपासून मद्याचे व्यसन असून त्याला खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्याला 23 एप्रिलला सकाळी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काल रात्री साडेअकरा वाजता त्याने अखेरचा (Pune Corona Deaths) श्वास घेतला.

पुण्यात कोरोनाचे 24 नवे रुग्ण 

पुण्यातील बालेवाडी येथील मुंबई-पुणे महामार्गाशेजारी असलेल्या निकमार महाविद्यालयात ‘इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन’ केलेल्या 300 जणांपैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी याबाबतची माहिती दिली. हे सर्व जण शहरातील इतर ठिकाणाहून येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये कुणीही स्थानिक रुग्ण नसल्याचेही त्यांनी सांगितले. इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन केलेल्या या नागरीकांचे अहवाल प्राप्त झाले असून 300 पैकी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना सिंबायोसिससह  इतर ठिकाणच्या दवाखान्यात हलवण्यात आलं आहे.

पुण्यात कोरोनाचे 876 रुग्ण

पुण्यात काल दिवसभरात (23 एप्रिल) ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या सव्वा महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात शंभरहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 876 वर गेली आहे. (Pune Maximum Corona Patients in a day) राज्यात काल तब्बल 778 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 427 वर गेली आहे.

Pune Corona Deaths
संबंधित बातम्या :

पिंपरी-चिंचवडमध्ये विळखा वाढला, कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कातील 11 जण पॉझिटिव्ह

बारामतीत एकाच कुटुंबातील चौघे ‘कोरोना’मुक्त, तालुक्यात आता एकच रुग्ण!

मुंबईहून पुण्याला परतलेल्या 4 एसआरपीएफ जवानांना कोरोना, 96 जवान क्वारंटाईन

पुणेकरांकडून निर्बंधांना फाटा, पोलिसांकडून 2 हजार 804 कारवाया, एक हजार 73 वाहने जप्त

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.