कोरोनाची चाचणीचं देशातील पहिलं किट पुण्यात विकसित, एकाचवेळी तब्बल 10 हजार टेस्ट शक्य
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी (Pune Corona Virus Kit) अचूक निदान करणारा देशातील पहिलं किट विकसित करण्यात आलं आहे.
पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी (Pune Corona Virus Kit) अचूक निदान करणारा देशातील पहिलं किट विकसित करण्यात आलं आहे. या कीटला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (D.C.G.I) सोमवारी मान्यता दिली आहे. यामुळे कोरोना निदानासाठी देशात दररोज दहा हजार जणांची चाचणी शक्य आहे. मायलॅब डिस्कवरी सॉल्यूशन या पुण्यातील कंपनीने हे किट विकसित केलं आहे.
देशभरात कोरोना बाधितांचा आकडा (Pune Corona Virus Kit) दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या निदानासाठी किट असणे अत्यावश्यक आहे. हे किट आतापर्यंत केंद्र सरकारद्वारे देशातील 52 प्रयोगशाळांना देण्यात येते. मात्र नुकतंच हे किट भारतीय कंपनीने पुण्यात विकसित केले आहे. त्याच्या गुणवत्तेची आणि अचूक रोगनिदानाची काटेकोर तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थाने केली आहे. त्यानंतर डीसीजीआयने त्याला मान्यता दिली.
आतापर्यंत हे कीट केंद्र सरकार आयात करुन प्रयोगशाळांना देत होते. मात्र आता हे किट पुण्यातील एका कंपनीने विकसित केलं आहे. या किटची गुणवत्ता आणि अचूक रोगनिधनाची काटेकोर तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केली आहे.
हे देशातील पहिलं किट असल्याचा दावा केला जात आहे. हे किट विकसित करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो.
या किटला उत्पादनाची परवानगी मिळाल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. त्यानुसार रोज एका शिफ्टमध्ये 10 हजार किट उत्पादन करण्यात आहे. येत्या काही दिवसात ही उत्पादन क्षमता वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान या किटद्वारे रुग्णाचे अचूक निदान अत्यंत गरजेचे आहे. मात्र ते न झाल्यास मोठा सामाजिक फटका बसू शकतो. त्यामुळे याची पुरेपूर काळजी घेण्यात येत (Pune Corona Virus Kit) आहे.