एल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : प्रसिद्ध तेलुगू कवी वरावर राव यांना 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयाने राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुणे पोलीसांनी राव यांना शनिवारी रात्री तेलंगणातील घरातून ताब्यात घेतलं होतं. नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा […]

एल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : प्रसिद्ध तेलुगू कवी वरावर राव यांना 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयाने राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुणे पोलीसांनी राव यांना शनिवारी रात्री तेलंगणातील घरातून ताब्यात घेतलं होतं.

नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या ते नजरकैदेत होते. राव यांना अटकेबाबत असलेले संरक्षणाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

राव यांच्या बरोरबर अटक करण्यात आलेले अरुण परेरा, वर्नन गोन्सालवीस आणि सुधा भारद्वाज हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, गौतम नवलखा हे नजरकैदेत आहेत. बचाव पक्षाने पोलीस कोठडीला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा संदर्भ न्यायालयामध्ये सादर केला होता. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने त्यावर खुलासा करून सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ आणि कायद्यातील तरतुदींच्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरवरा राव यांना 8 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.