Pune Rain | पुणेकरांची तहान वर्षभर भागणार, पुण्यातील धरणांमध्ये 62.21 टक्के पाणीसाठा
चारही धरणांमध्ये आतापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21% टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे.
पुणे : पुणेकरांची तहान भागवणाऱ्या धरण साठ्याच्या क्षेत्रात संततधार पाऊस पडतो आहे (Pune Dam Water Level). संततधार पावसानं चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये आतापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21% टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे (Pune Dam Water Level).
गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसानं दिलासा मिळाला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
पुण्यातील स्थलांतरित लोकसंख्या साधारण 52 लाख आहे. एवढ्या लोकसंख्येला महिन्याला दीड टिएमसी पाणीपुरवठा लागतो. त्यामुळे पिण्याची पाण्याची चिंता मिटली, तरी शेतीच्या पाण्याची समस्या मिटण्यासाठी धरण 100 टक्के भरणं आवश्यक आहे (Pune Dam Water Level).
हवामान विभागाने पुढील 6 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शहर परिसर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
चार धरणात 62.21 टक्के पाणीसाठा
– खडकवासला 1.87 टीएमसी म्हणजेच 94.79 टक्के पाणीसाठा आहे.
– पानशेत 7.35 टीएमसी म्हणजेच 69 टक्के जलसाठा.
– वरसगाव धरणात 7.33 टीएमसी म्हणजेच 57.17 टक्के जलसाठा,
– टेमघर धरणात 1. 59 टीएमसी म्हणजेच 42.80 टक्के आहे.
पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलंhttps://t.co/TPj8PlrfHT
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2020
Pune Dam Water Level
संबंधित बातम्या :
पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार