पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार, ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदी
सायकलिंग, रनिंग, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आल्याने पुणेकरांना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडता येणार (Pune Garden Sports Ground Re-Open) आहे.
पुणे : राज्य सरकारने लॉकडाऊन 5 च्या नियमावलीत सूट दिली (Pune Garden Sports Ground Re-Open) आहे. राज्यात आजपासून मिशन बिगीन अगेन सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना रोज मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडता येणार आहे.
पुणे शहरातील 199 पैकी 150 उद्याने उद्या मंगळवारपासून सुरु होणार (Pune Garden Sports Ground Re-Open) आहेत. या उद्याने किंवा मैदानात मंगळवारपासून मॉर्निंग वॉक करता येणार आहे.
मात्र कोरोनाबाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या उद्यानात प्रवेश करता येणार आहे. पुणे शहरातील मैदाने किंवा उद्याने सुरु होणार असली तरी मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.
कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.
- पहिला टप्पा – 3 जून
- दुसरा टप्पा – 5 जून
- तिसरा टप्पा – 8 जून
नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?
- 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक
- कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार
- सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी
- सार्वजनिक मैदानेही खुली होणार
- समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी
- धार्मिक स्थळं बंदच राहणार
- स्टेडिअम मात्र बंदच राहणार
- फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश
- लांबच्या प्रवासावर बंदी
- शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार
- मेट्रो बंदच राहणार
- आंतरराज्य प्रवासाला परवानगी नाही
रेल्वे स्टेशन ते घर, मुंबईत केवळ पाच स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी https://t.co/kq80V7OOxQ #Taxi #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2020
संबंधित बातम्या :
Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?
Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?