शटर डाऊन, कटिंग सुरु, पुण्यात हेअर सलून मालकावर गुन्हा
(Pune Hair cut Saloon booked)
पुणे : लॉकडाऊनच्या काळात वाढणारे केस आणि दाढी अनेकांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. काही जणांनी घरच्या घरी हेअरकट करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु काही जण लपूनछपून सलूनचा रस्ता धरताना दिसत आहेत. पुण्यात शटर डाऊन करुन हेअर कटिंग करणाऱ्या सलून मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Hair cut Saloon booked)
लॉकडाऊन काळात दाढी आणि केस कटिंग करणं पुण्यातील हेअर सलून मालकाला चांगलंच महागात पडलं आहे. अँगल हेअर सलूनमध्ये बाहेरुन शटर बंद करुन आत धंदा सुरु ठेवण्यात आला होता. पेट्रोलिंगवरील पोलिसांना संशय आल्याने तपास केला असता, आत दाढी कटिंग सुरु असल्याचं दिसलं.
शासन आदेश मोडून हेअर सलून सुरु ठेवल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मास्क न लावल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे. कर्फ्यू असतानाही सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.
VIDEO : Corona | पुण्यात संचारबंदीत मद्यविक्री सुरुचhttps://t.co/DvEzMycL4E
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 10, 2020
पुण्यात काल सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 25 जणांचा बळी गेला आहे. एका दिवसात बारा नवे रुग्ण आढळले. नेहमीच्या तुलनेत शहरातील कोरोनाबाधितांची वाढ काहिशी आटोक्यात आल्याचं चित्र आहे. मृत सात रुग्णांना इतर आजारांनी ग्रासलेले होतं, अनेक मृतांचं वयोमान 55 वर्षांवरील आहे. गुरुवारी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 209 होती. यामध्ये पुणे शहरातील 176 कोरोना बाधित आहेत. (Pune Hair cut Saloon booked)