पुण्यात लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाची आत्महत्या
पुण्यात लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाने आत्महत्या केली. प्रेमनाथ शेट्टी या हॉटेल व्यवसायिकाने आत्महत्या केली आहे.
पुणे : पुण्यात लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाने आत्महत्या केली (Pune Hotel Manager Commit Suicide). प्रेमनाथ शेट्टी या हॉटेल व्यवसायिकाने आत्महत्या केली आहे. धायरी परिसरातील राज या हॉटेलमध्ये गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. सकाळी साधारण 9 वाजताच्या दरम्यान शेट्टी यांनी आत्महत्या केल्याची (Pune Hotel Manager Commit Suicide) माहिती आहे.
शेट्टी यांनी हॉटेल भाड्याने घेतलं असून ते या हॉटेलचे मॅनेजर होते. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, मानसिक नैराश्य आणि लॉकडाऊनमुळे आलेला तणाव यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेट्टी हे धायरी परिसरात हॉटेल व्यवसाय करत होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे व्यवसायिक संकट आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सकाळी हॉटेलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहे.
शिर्डीतही व्यावसायिकाची आत्महत्या
शिर्डीत काल (24 जून) एका 55 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीराम चुटके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या व्यावसायिकाचे दुकान अहमदनगर-मनमाड महामार्गावर साईमंदिराजवळ आहे. स्वत:च्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
शिर्डीत साईमंदिराजवळ व्यावसायिकाची आत्महत्या, स्वत: च्या दुकानातच गळफासhttps://t.co/JDUJTSNhZv #shirdi
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
Pune Hotel Manager Commit Suicide
संबंधित बातम्या :
Pune Suicide | मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या
Pune Corona : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेत सर्वसामान्यांना प्रवेशबंदी