Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यातील काही भागात ‘या’ अटींसह उद्योगधंद्यांना परवानगी

स्वतंत्र वेबपोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील काही भागात उद्योगधंद्यांना सशर्त परवानगी देण्यात येणार आहे. (Pune industrial work conditional permission)

पुणे जिल्ह्यातील काही भागात 'या' अटींसह उद्योगधंद्यांना परवानगी
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 9:23 AM

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी वगळून पुणे जिल्ह्यातील काही भागात सर्व क्षेत्रातील उद्योगांना काही अटी आणि शर्तींवर आजपासून परवानगी देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 669 वर गेली असतानाही काही अटींसह परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Pune industrial work conditional permission)

उद्योगांना परवानगी देताना ते कोरोनाबाधित क्षेत्र नाही, तसेच स्थानिक आणि कमीत कमी कर्मचारी वर्गात काम चालेल, या प्रमुख अटी असल्याची माहिती उद्योग विभागाचे सहसंचालक एस. एस. सुरवसे यांनी दिली. त्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल तयार करण्यात येत असून, त्या माध्यमातून ही परवानगी देण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी कंपनी आहे, त्याच ठिकाणचे कामगार असतील, किंवा कंपनीच्या कॉलनी, गेस्ट हाऊसमध्ये राहणारे कामगार असतील, त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. अन्य शहरातून अथवा ठिकाणाहून कामगारांची ने-आण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कामाच्या ठिकाणीदेखील पुरेशी काळजी घेऊन आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून काम करण्याचे बंधन राहणार आहे.

पुणे शहर सील

संपूर्ण पुणे, पिपरी-चिंचवड आता कंटेन्टमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल (रविवार) मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस (27 एप्रिलपर्यंत) पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.

आतापर्यंत दोन्ही शहरातील काही भागच सील होते, मात्र पूर्ण शहर लॉकडाऊन करण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे. पुणे आणि पिपरी-चिंचवड या दोन्ही शहरात मिळून 75 लाख लोकसंख्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यात 15 पैकी 13 वॉर्ड रेड झोन, तर 2 वॉर्ड ऑरेंज झोनमध्ये आहेत.

दुकाने बंद

दरम्यान, नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने दुकाने बंद करण्याचा निर्णय पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने घेतला आहे. पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.

सतत गर्दी होत असल्यान किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील दुकान बंद राहणार आहेत. (Pune industrial work conditional permission)

किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान (मंगळवार ते शुक्रवार) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गरज पडल्यास घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतानाही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. रविवारी एका दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57 ने वाढली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 669 वर गेली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या

पुणे शहर : 562 पिंपरी चिंचवड : 54 पुणे ग्रामीण : 50 एकूण मृत्यू : 50 पुणे जिल्हा एकूण : 669

(Pune industrial work conditional permission)

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.