पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल, मेट्रोच्या कामावर 1 हजार मजूर
एका महिन्यात पुण्यात तब्बल 32 हजार 273 नागरिक, मजूर दाखल झाले आहेत. 1 जून ते 30 जून या कालावधीत हे कामगार पुण्यात पोहोचले आहेत.
पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर पुण्यात (Pune Labors Coming Back) येणाऱ्या परप्रांतिय नागरिक, मजुरांचा ओघ कायम आहे. एका महिन्यात पुण्यात तब्बल 32 हजार 273 नागरिक, मजूर दाखल झाले आहेत. 1 जून ते 30 जून या कालावधीत हे कामगार पुण्यात पोहोचले आहेत. बिहार, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि दिल्लीतून मजूर येत आहेत. तब्बल सहा राज्यातून हे परप्रांतिय मजूर येत असून सर्वाधिक जास्त मजूर बिहार राज्यातील आहेत (Pune Labors Coming Back).
पुण्यात कुठल्या राज्यातून किती मजूर आले?
- बिहार – 28 हजार 965 मजूर
- कर्नाटक – 1,285 मजूर
- गोवा – 397 मजूर
- आंध्रप्रदेश – 311 मजूर
- ओदिशा – 564 मजूर
- दिल्ली – 751 मजूर
दिवसेंदिवस येणाऱ्या परप्रांतिय नागरिकांनी मजुरांची संख्या वाढतच आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे येणाऱ्या नागरिक मजुरांचा वेग कमी आहे.
मेट्रोच्या कामावर 1 हजार 80 मजूर
पुणे मेट्रोवर (Pune Metro) कामासाठी 800 मजूर पोहोचले आहेत. मेट्रोवर नव्याने 200 कामगार दाखल झाले. त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामगारांची संख्या 1 हजार 80 वर पोहचली आहे. अजूनही संख्या वाढत जाणार आहे (Pune Labors Coming Back).
मुंबईतून पुणेमार्गे गदग एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, हुसैन सागर एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस धावतात. तर, पुण्यातून बिहारसाठी फक्त दानापूर एक्सप्रेस ही एकमेव गाडी सुटते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतिय प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाते. यासाठी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक आणि महसूल पथक 24 तास तैनात आहे. प्रवाशांना कोरोना संदर्भात लक्षण आढळल्यास संस्थात्मक विलगीकरण केलं जातं. तर उर्वरित प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईनच्या सूचना केल्या जातात (Pune Labors Coming Back).
लॉकडाऊनचा फटका, पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोरhttps://t.co/yoL3eruoHQ#Lockdown #Corona #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2020
संबंधित बातम्या :
पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश
पुण्यात कोरोना संदर्भात परस्पर आदेश काढणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीवर गुन्हा दाखल