दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये

पुण्यात दारु घेण्यासाठी सलग (Pune line for wine) दुसऱ्या दिवशी मद्यपींच्या वाईन शॉपसमोर मोठमोठ्या रांगा आहेत.

दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 1:05 PM

पुणे : राज्यभरात दारु खरेदीसाठी दुकानांबाहेर आजही रांगा लागल्या आहेत. पुण्यात दारु घेण्यासाठी सलग (Pune line for wine) दुसऱ्या दिवशी मद्यपींच्या वाईन शॉपसमोर मोठमोठ्या रांगा आहेत. दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत दिसले. यावेळी महिलाही वाईन शॉपच्या रांगेत उभी असल्याचं दिसलं. (Pune line for wine)

मद्य विक्रेत्यांनी सोमवारच्या गोंधळानंतर संरक्षक उपाययोजना राबवल्या आहेत. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानासमोर गोलाकार वर्तुळ करण्यात आलं, तर काही ठिकाणी बांबूचे बॅरिकेट्स लावले आहेत. इतकंच नाही तरर गर्दी नियंत्रणासाठी काही ठिकाणी बाउन्सरही तैनात होते.

राज्य सरकारने कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर भागात मध्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. अटी, नियम आणि शर्तीनुसार ही परवानगी दिली आहे. मद्य विक्रीला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी दारुसाठी मद्य प्रेमींची गर्द झाली. सकाळी सहा वाजल्यापासून तळीरामांनी रांगा लावल्या होत्या. या रांगेत महिलाही दिसली.

पुण्यात पेट्रोल भरण्यासाठी रांगा

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात काहीप्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या 97% भागात काही प्रमाणात शिथीलता आहे. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अटी आणि शर्थीनुसार परवानगी देण्यात आली. त्यामुळं शहरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या. सकाळपासूनच रांगा पाहायला मिळत होत्या. तर प्रत्येक ग्राहकाचं ओळखपत्र, नाव नोंदणी करुनच त्याला पेट्रोल दिलं जात आहे. सोशल डिस्टन्स ठेवूनच ग्राहकही इंधन भरत होते.

हेही वाचा : गाडीवरुन नाही, पायी जा, दारु खरेदीसाठी पुणे पोलिसांचे 6 नियम

पुण्यात 71 नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात सोमवारी 71 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 2 हजार 122 वर गेली आहे. पुण्यात 24 तासात 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 115 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 878 रुग्ण असून आतापर्यंत 107 ‘कोरोना’ग्रस्त दगावले आहेत.

(Pune line for wine)

संबंधित बातम्या 

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती? 

पुण्यात हॉटस्पॉट वगळता इतरत्र अंशतः शिथिलता, प्रत्येक रस्त्यावर दहा दुकानं उघडणार 

 गाडीवरुन नाही, पायी जा, दारु खरेदीसाठी पुणे पोलिसांचे 6 नियम

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.