पुण्यातून 500 चाईल्ड पॉर्न क्लिप अपलोड, खडक पोलिसात तिसरा गुन्हा, एकाला अटक

पुण्यातून चाईल्ड पॉर्नच्या तब्बल 500 हून अधिक क्लिप इंटरनेटवर अपलोड झाल्या आहेत. खडक पोलीस ठाण्यात याबाबत तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातून 500 चाईल्ड पॉर्न क्लिप अपलोड, खडक पोलिसात तिसरा गुन्हा, एकाला अटक
गहना वशिष्ठ ही शुटिंग झाल्यानंतर तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. या व्हिडीओची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेश कामतला पाठवायची.
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 9:08 AM

पुणे : चाईलन्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत धडक कारवाया सुरु आहेत. चाईल्ड पॉर्न व्हिडीओ (Pune case against Child porn video ) किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडीओ, फोटो तुम्ही कुणाला पाठवला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकते. चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. असं असताना इकडे पुण्यात ढिगभर चाईल्ड पॉर्न क्लिप इंटरनेटवर (Pune case against Child porn video ) अपलोड झाल्याचं उघड झालं आहे.

पुण्यातून चाईल्ड पॉर्नच्या तब्बल 500 हून अधिक क्लिप इंटरनेटवर अपलोड झाल्या आहेत. खडक पोलीस ठाण्यात याबाबत तिसरा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  राज पुट्टीलाल असं या बहाद्दराचं नाव आहे.

पुट्टीलालच्या मोबाईलवरुन 28 एप्रिल 2019 रोजी लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. पुट्टिलालचे  सिमकार्ड काकाचा मुलगा वापरत असून तो अल्पवयीन आहे. पुणे आणि पिंपरीतील 14 प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी अजूनही गुन्हे दाखल होऊन अटकेची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल

दरम्यान, बीड जिल्ह्यातही चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी गेल्या महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर सेलकडून राज्यभरात एकूण 27 व्हिडीओवरती कारवाई करण्यात येत आहे. त्यापैकी दोन व्हिडीओ हे बीड जिल्ह्यातून अपलोड झालेले पोलिसांना आढळले आहेत. एक व्हिडीओ गेवराई, तर दुसरा व्हिडीओ परळी येथून सोशल मीडियावर अपलोड झाला आहे.

केंद्राचा कडक कायदा

चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. आता यापुढे एक पाऊल टाकत केंद्र सरकारने लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.  चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची तरतूद करण्यात आली आहे.  यापूर्वीही 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार झाल्यास आरोपीला फाशी देण्याची तरतूद केंद्र सरकारने केली होती.

पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड

भारतातील चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यात भारतातून तब्बल 25 हजार चाईल्ड पॉर्न व्हिडीओज् विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर अपलोड (India Child Pornography Report) झाले आहेत.

राजधानी दिल्लीतून सर्वाधिक चाईल्ड पॉर्न अपलोड करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा टॉप 5 मध्ये समावेश होतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

संबंधित बातम्या 

पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, अमेरिकेची आकडेवारी 

Whatsapp वर पॉर्न व्हिडीओ पाठवताय? बीडमध्ये दोन गुन्हे दाखल 

चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची शिक्षा!

या कंपन्यांचं सिम वापरत असाल तर पॉर्न साईट चुकूनही पाहू नका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.