Pune IAS Transfer | पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशामुळे आल्याने शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
पुणे : मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बदलीनंतर आता (Pune Municipal Corporation Commissioner Shekahr Gaikwad Transfer) पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांचीही बदली करण्यात आली आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पीएमआरडीएचे विक्रम कुमार यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
अवघ्या सहा महिन्यांमध्ये शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. शेखर गायकवाड व्यतिरिक्त आणखी 4 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
कुठे कुणाच्या बदल्या?
– सौरभ राव (2003 बॅचचे आएएस) यांची साखर आयुक्तालयातून पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
– शेखर गायकवाड (2003 बॅचचे आएएस) यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्याच्या साखर आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
– विक्रम कुमार (2004 बॅचचे आएएस) यांची पीएमआरडीएच्या सीईओपदावरुन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
– पुण्यातील कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवासे (2009 बॅचचे आएएस) यांची पीएमआरडीएच्या सीईओपदी नियुक्त झाली आहे.
– जितेंद्र दुडी (2016 बॅचचे आएएस) यांची सांगली जिल्हापरिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Pune Municipal Corporation Commissioner Shekahr Gaikwad Transfer
पुण्यातील लॉडकडाऊनमध्ये वाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. पुण्यातील कोरोनाला आळा घालण्यात अपयश आल्यानेच शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
पुण्यात कोरोनाचे 26 हजार 904 रुग्ण
आज दिवसभरात कोरोनाचे 827 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात सध्या कोरोनाचे 26 हजार 904 रुग्ण आहेत. तर 808 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 16 हजार 996 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा https://t.co/UV5tsA1TuX #VasaiVirar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2020
Pune Municipal Corporation Commissioner Shekahr Gaikwad Transfer
संबंधित बातम्या :
पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली
IAS Transfer | ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली, डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त
IAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले