कोरोना लढ्यासाठी पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती, 178 जागा भरणार

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (PMC Doctor Recruitment) आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे.

कोरोना लढ्यासाठी पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती, 178 जागा भरणार
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 12:32 PM

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (PMC Doctor Recruitment) आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. पुणे आरोग्य विभागातील वर्ग एक आणि दोनच्या तब्बल 178 जागा भरण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबतची जाहिरात येत्या दोन दिवसात प्रकाशित केली जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबईनतंर पुण्यात पाहायला मिळत (PMC Doctor Recruitment) आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेतील अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदांपैकी 1 हजार 086 पदे भरण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती केली जाणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील वर्ग एक आणि दोनच्या तब्बल 178 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 दिवसात सरळ सेवा पद्धतीने ही पद भरली जाणार आहेत. या संदर्भातील जाहिरात येत्या दोन दिवसात प्रकाशित करण्यात येणार आहे.

या भरतीमध्ये वर्ग एकच्या 121 जागा, तर वर्ग दोनच्या ५७ पदांचा समावेश आहे. ही भरती गुणवत्तेवर आधारित होणार आहे. त्यासाठी शिक्षण, कामाचा अनुभव आणि सेवेची वर्षे यावर उमेदवाराची भरती अवलंबून असणार आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

दरम्यान नुकतंच पुण्यात शिक्रापूर परिसरामध्ये 144 गर्भवतींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आल्यामुळे या गरोदर महिलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पुण्यात काल कोरोनाचे 65 नवे रुग्ण आढळले आहेत. ससून हॉस्पिटलमधल्या 3 नर्सेससह 21 जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. आता पुण्यातली एकूण रुग्णसंख्या 343 वर पोहोचली आहे. पुण्यात कोरोनाचे आतापर्यंत 35 बळी (PMC Doctor Recruitment) गेले आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.