पुणे मनपाची कोरोना रोखण्यासाठी बैठक, बैठकीला 2 तास हजेरी लावलेल्या महिला अधिकाऱ्याच्या पतीला कोरोना
पुणे महापालिकेत बैठकीला महापौर, महापालिका आयुक्त असे 30 ते 35 पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation Lady Officer Husband diagnosed with Corona)
पुणे : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित महिला पदाधिकाऱ्याच्या पतीलाच ‘कोरोना’ झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बैठकीला हजेरी लावलेल्या अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली होती. परंतु महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Pune Municipal Corporation Lady Officer Husband diagnosed with Corona)
सोमवारी दुपारी पुणे महापालिकेत ‘कोरोना’बाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्वपक्षीय गटनेते असे 30 ते 35 पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
बैठकीला उपस्थित राहिलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या पतीचा ‘कोरोना’ रिपोर्ट सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला दोन तास बैठकीला उपस्थित होती. तिने इतरांशी संवादही साधला होता. त्यामुळे बैठकीला उपस्थित अधिकारी-पदाधिकारी सध्या कोरोना भीतीच्या सावटाखाली होते. मंगळवारपासून सर्व पदाधिकारी घरातच थांबून होते.
हेही वाचा : सायन हॉस्पिटलची नर्स आणि तिच्या पतीविरोधात वर्ध्यात गुन्हा, प्रशासनाचा गंभीर आरोप
बुधवारी सकाळी महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पालिकेचे अधिकारी पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र महिलेच्या पतीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याने तिला पुढील किमान सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा तिचा स्वॅब घेण्यात येणार आहे.
VIDEO : पुणे जिल्ह्यात 327 नवे कोरोनाग्रस्त, SRPF च्या 14 जवानांना लागण https://t.co/uuy1ZmVuPQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
(Pune Municipal Corporation Lady Officer Husband diagnosed with Corona)