कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणे महानगरपालिकेचं ‘सुपर स्प्रेडर्स’वर लक्ष

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल चालक, वेटर आदी सुपर स्प्रेडर्सवर पालिकेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. या सुपर स्प्रेडर्सची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुढील आठवड्यापासून या चाचण्या सुरु होणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणे महानगरपालिकेचं 'सुपर स्प्रेडर्स'वर लक्ष
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 9:05 AM

पुणे: राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘सुपर स्पेडर्स’चा धोका अधिक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं या ‘सुपर स्पेडर्स’वर खरं लक्ष असणार आहे.(Pune Municipal Corporation will focus on Super Spreaders)

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल चालक, वेटर आदी सुपर स्प्रेडर्सवर पालिकेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. या सुपर स्प्रेडर्सची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुढील आठवड्यापासून या चाचण्या सुरु होणार आहेत. गेल्या आठ महिन्यातील उपाययोजनांचा फायदा पुणे महापालिकेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होईल, असं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

‘दिवाळीच्या गर्दीत कोरोना चेंगरुन मेला’

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लोकं मेल्यावर लस येईल का? असा उद्विग्न सवाल केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. तसेच सध्या सरकारची तारेवरची कसरत सुरु असल्याचं सांगितलं.

यावेळी अजित पवार यांनी दिवाळीच्या काळात पुण्यातील बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड परिसरातील गर्दीवरुन पुणेकरांना चांगलेच टोले लगावले. दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, असं खोचक टोला पवारांनी लगावला. अजित पवारांचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलं.

कोरोनाची दुसरी लाट महागात पडू शकते- आरोग्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. राज्यात ती येऊ नये असं वाटतं पण मनात भीती असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल, संयमी राजेश टोपेंचा पहिल्यांदाच रोखठोक इशारा

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना

Pune Municipal Corporation will focus on Super Spreaders

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.