यवतमाळचा ‘शेतकरीमित्र’ ते साताऱ्यातील दुष्काळमुक्ती; पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची धडाकेबाज कारकीर्द

डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2008 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

यवतमाळचा 'शेतकरीमित्र' ते साताऱ्यातील दुष्काळमुक्ती; पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची धडाकेबाज कारकीर्द
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 8:34 AM

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख आज (19 ऑगस्ट) सूत्रे स्वीकारणार आहेत. डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्याने जिल्हा प्रशासन अधिक एकसंघ व कार्यक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Pune New Collector Dr Rajesh Deshmukh Bio)

डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. डॉ. राजेश देशमुख यांची क्षमता लक्षात घेऊनच पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोनोचं वाढतं आव्हान पेलण्यासाठी त्यांची जिल्हाधिकारीपदी निवड केली

डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2008 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणूनही काम

विधानपरिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयएएस श्रेणीत निवड झाल्यानंतर डॉ. देशमुख यांनी पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. जिल्हा परिषदेचा आलेख सातत्याने उंचावत गेला.

सुरुवातीला जिल्ह्याचा 62 हजार शौचालयांचा अनुशेष पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. माण, खटाव, कोरेगावसारख्या तालुक्यात दुष्काळमुक्ती व रोजगारनिर्मितीसाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

साताऱ्यात 72 गावांचा कायापालट

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील 72 गावांचा कायापालट करुन दाखवला. गावात आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला. गावांच्या विकासासाठी 110 कोटींचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी केली.

खासगी उद्योग, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं. डिजिटल शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, बालविकास, बचतगट चळवळ सक्षम करणं अशा अनेक स्तरांवर त्यांची कामगिरी सरस ठरली आहे.

स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजनेसारख्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याने त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर अव्वल यश मिळालं. त्याबद्दल डॉ. देशमुख यांचं राष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे. अवघ्या 14 महिन्यात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून जिल्हा परिषदेला वेगळी उंची प्राप्त करुन दिली.

यवतमाळचा ‘शेतकरीमित्र’

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही डॉ. राजेश देशमुख यांनी स्वतंत्र छाप सोडली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील फवारणीमुळे एकावेळी 22 जणांचा मृत्यू झाला होता. डॉ. देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वत: फवारणीयंत्र हाती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.

फवारणीबाबत शेतकरी जनजागृतीसाठी अभियान सुरु केलं, त्यांच्या प्रयत्नांमुळेच नंतरच्या दोन वर्षात जिल्ह्यात विषारी फवारणीमुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही. (Pune New Collector Dr Rajesh Deshmukh Bio)

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांनाही त्यांनी वठणीवर आणलं. असहकार्य करणाऱ्या बँकांमधली सरकारी खाती बंद करुन त्यांनी त्या बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीचं कौतुक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही झालं होतं.

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, सर्वांसाठी घरे, राष्ट्रीय महामार्गाचे काम, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठीचं अधिग्रहण, ऑक्सिजन पार्क, शासकीय कामकाजात सुलभता आणली

यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी राबवलेला मागेल त्याला शेततळे कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. त्या अंतर्गत जिल्ह्यात सात हजार शेततळी निर्माण करण्यात आली. 900 शेततळ्यात मत्स्यशेती सुरु झाली. यातून शेतकऱ्यांना जोडव्यवसाय मिळाला.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणून जिल्हा कोरोनामुक्त करणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. हे आव्हान ते नक्की पेलतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार फिल्डिंग, मंत्र्यांकडे लॉबिंग, चार नावं चर्चेत

(Pune New Collector Dr Rajesh Deshmukh Bio)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.