Corona Virus | पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद, पेट्रोल डीलर्सचा बंदला अर्धवेळ पाठिंबा

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला (Pune Petrol Pump Shut Down) आहे.

Corona Virus | पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद, पेट्रोल डीलर्सचा बंदला अर्धवेळ पाठिंबा
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 9:03 AM

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुण्यातील सर्व पेट्रोल (Pune Petrol Pump Shut Down) पंप दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंदच्या आवाहानाला अर्धवेळ पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शनिवारी 21 मार्चपासून पुणे शहरातील सर्व पेट्रोलपंप दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे.

पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या या निर्णयानुसार, पुणे शहरातील (Pune Petrol Pump Shut Down) सर्व पेट्रोल पंप हे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहतील. तर शहराबाहेरील पेट्रोलपंप हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. पुढील दहा दिवस म्हणजे 31 मार्चपर्यंत हे सर्व पंप हे दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास पेट्रोल पंपावर यावे असे आवाहन संघटनेने केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 52 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 41 जणांची प्रकृती उत्तम असून आठ जणांना सौम्य लक्षणे पाहायला मिळत आहेत.

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे पिंपरी 12 आणि पुणे 9 मिळून 21 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

दरम्यान मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 10 शहरांचे व्यवहार आजपासून (21 मार्च) पुढील 10 दिवस ठप्प झाले आहेत. या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालयांना टाळे लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तर सरकारी कार्यालयातील 25 टक्के कर्मचारी उपस्थिती आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 9
  • मुंबई – 11
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 2
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1 एकूण 52
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.