Corona | बससाठी आणखी 20 मिनिटं थांबा, पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द
बस वाहतुकीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी बसफेऱ्याची संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे Pune PMPML Bus reduced
पुणे : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दर 10 मिनिटांऐवजी आता 20 मिनिटानी बस स्टॉपवर बस येणार आहे. गर्दीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे. (Pune PMPML Bus reduced)
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या दररोज 1800 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मात्र बस वाहतुकीच्या माध्यमातून ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार आज (बुधवार 18 मार्च) बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पहिल्या 24 तासात प्रवासी संख्या 12 लाखांवरुन 9 लाखांवर आली आहे.
‘कोरोना’विषयी जनजागृती झाल्यामुळे अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडणं पसंत केलं आहे. खाजगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती देणारे पुणेकर घरी राहण्यात धन्यता मनात आहेत. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. PMPML ची प्रवासी संख्या रोडावली आहेच. मात्र सार्वजनिक वाहतुकीतून ही आकडेवारी वाढू नये, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पीएमपीएलचे रोजचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु ‘कोरोना’सारखा जीवघेणा विषाणू फोफावण्यापेक्षा होणारे नुकसान परवडणारे आहे. (Pune PMPML Bus reduced)
Mumbai Local | पॅनिक होऊ नका, मुंबई लोकल सुरुच राहणार, बस, मेट्रोही धावणार!
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एकाला ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतही काळजी घेतली जात आहे. लोकॅल आणि ‘बेस्ट’ बस बंद करण्याचा निर्णय घेतला नसला तरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आलं आहे. फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आलं आहे.
Maharashtra: Central Railway has vinyl wrapped a 12 coach Mumbai local train with messages regarding #COVID19, in order to raise awareness among commuters. pic.twitter.com/mZ7WFsngFv
— ANI (@ANI) March 17, 2020
Pune PMPML Bus reduced